कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

2025-26 या आर्थिक वर्षात स्वतःच्या वापराच्या उद्देशाने आणि व्यावसायिक उद्देशाच्या खाणकामाअंतर्गत कोळसा उत्पादन आणि वितरणाने गाठला विक्रमी टप्पा - कोळसा मंत्रालय

Posted On: 02 APR 2026 3:04PM by PIB Mumbai

 

आर्थिक वर्ष 2025–26 हा काळ भारताच्या कोळसा क्षेत्रातील महत्वाचा टप्पा  असल्याचे कोळसा मंत्रालयाने म्हटले आहे. या कालावधीत कॅप्टिव्ह अर्थात स्वतःच्या वापरासाठीच्या आणि व्यावसायिक खाणकामाअंतर्गत यापूर्वी कधीही न गाठलेला टप्पा गाठला असल्याचे मंत्रालयाने अधोरेखित केले आहे. या उद्देशांसाठीच्या कोळसा खाण क्षेत्रांमधील एकत्रित उत्पादन आणि वितरणाअंतर्गत पहिल्यांदाच 200 दशलक्ष टनाचा (एमटी) टप्पा ओलांडला गेला आहे. यातून या क्षेत्राने देशाच्या ऊर्जा क्षेत्राची व्याप्ती, क्षमता आणि योगदानाच्या बाबतीत निर्णायक झेप घेतली असल्याचे दिसून येते असे मंत्रालयाने म्हटले आहे.

31 मार्च  2026 पर्यंत, स्वतःच्या वापरासाठीच्या आणि व्यावसायिक उद्देशासाठीच्या खाणींमधील कोळसा उत्पादनात, मागील आर्थिक वर्षातील 190.95 दशलक्ष टनाच्या तुलनेत 10.22% इतकी वर्षागणिक वाढ होऊन ते  210.46 दशलक्ष टनापर्यंत पोहोचले.  कोळसा वितरणामध्येही मोठी वाढ नोंदवली गेली असून, ते 204.61 दशलक्ष टनावर पोहोचले आहे. आर्थिक वर्ष 2024–25 मधील 190.42 दशलक्ष टनाच्या तुलनेत यात 7.35% इतकी वाढ झाली आहे. विक्रम मोडीत काढणाऱ्या या आकडेवारीतून, कार्यान्वयनात्मक कार्यक्षमतेत घडून आलेली सुधारणा, व्यावसायिक वाहतूक आणि रसद पुरवठा व्यवस्थापनाला (लॉजिस्टिक्स) मिळालेली बळकटी आणि देशाची उर्जेची वाढती मागणी पूर्ण करण्याची या क्षेत्राची वाढत असलेली क्षमता दिसून येते असे मंत्रालयाने म्हटले आहे.

2025–26 या आर्थिक वर्षात गाठलेले महत्त्वाचे टप्पे

  • 200+ दशलक्ष टनाचा ऐतिहासिक  टप्पा : स्वतःच्या वापरासाठीच्या /व्यावसायिक उद्देशासाठीच्या खाण क्षेत्रांमधील उत्पादन आणि वितरणाने पहिल्यांदाच 200 दशलक्ष टनाचा टप्पा ओलांडला. हे यश सातत्यपूर्ण प्रगती आणि कार्यान्वयनात्मक उत्कृष्टतेचे प्रतिक ठरले आहे.
  • नवीन खाण क्षेत्रे कार्यान्वित करणे :2025–26 या आर्थिक वर्षा दरम्यान, खाणी खुल्या करण्याची  परवानगी (MOP) देत, स्वतःच्या वापरासाठीच्या उद्देशाकरता आणि व्यावसायिक उद्देशासाठीची  कोळशाची 12  खाण क्षेत्रे कार्यान्वित केली गेली. यामुळे वार्षिक उत्पादन क्षमतेत 86 दशलक्ष टनापेक्षा जास्त भर पडली, परिणामी कोळसा खाणकामाचे आधारभूत क्षेत्र लक्षणीयरीत्या विस्तारले आहे.
  • उत्पादन सुरू होण्याचा वेग वाढला: याच आर्थिक वर्षात आणखी 7 कोळसा खाण क्षेत्रांमध्येही  कोळसा उत्पादन घेणे सुरू झाले. यातून प्रकल्पांची वेगाने अंमलबजावणी केली जात असल्याचे, तसेच नियमनाविषयीच्या समन्वयात सुधारणा घडून आल्याचे दिसून येते.

आकृती : स्वतःच्या वापरासाठीच्या उद्देशाच्या तसेचव्यावसायिक उद्देशासाठीच्या खाणींची सलग चार वर्षांची उत्पादन आणि वितरण विषयक आकडेवारी

या आलेखातून गेल्या चार वर्षांमधील कोळसा उत्पादन आणि वितरण या दोन्हींच्या बाबतीतील स्थिर आणि प्रगतीच्या बाबतीतील चढत्या क्रमाचा कल दिसून येतो. या अंतर्गत वितरणामध्ये दिसून येत असलेल्या सातत्यपूर्ण वाढीमधून, व्यावसायिक वाहतूक आणि रसद पुरवठा व्यवस्थापनाची वाढलेली कार्यक्षमता, कोळसा सुरळीतपणे बाहेर काढण्याची सुव्यवस्थित प्रक्रिया आणि कोळसा क्षेत्राची  अधिक मजबूत तसेच लवचिक पुरवठा साखळी अस्तित्वात असल्याचे अधोरेखित होते.

हे ऐतिहासिक यश म्हणजे, देशाच्या आत्मनिर्भर भारत घडवण्याच्या वचनबद्धतेचे प्रतिक ठरले असून, लक्ष्यित धोरणात्मक उपाययोजना, मान्यतेसाठीची सुव्यवस्थित व्यवस्था आणि देशांतर्गत कोळसा उत्पादनाला नव्याने दिली गेलेली चालना हे त्यासाठीचे कारक घटक ठरले आहे. या यशातून स्वतःच्या वापरासाठीच्या उद्देशाने तसेच, व्यावसायिक उद्देशाने केल्या जाणाऱ्या खाणकामासाठी पोषक परिसंस्था उभारण्याकरता मंत्रालयाच्या वतीने सातत्यपूर्णतेने केले जात असलेले प्रयत्नही अधोरेखीत झाले आहेत. यामुळे आयातीवरचे अवलंबित्व कमी होऊन राष्ट्रीय संसाधनाच्या सुरक्षेलाही बळकटी मिळाली आहे.

***

निलिमा चितळे/तुषार पवार/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

  Goa

Follow us on social media: @PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pibpanaji  pibgoa[at]gmail[dot]com  /PIBPanaji    /pibpanaji


(Release ID: 2248515) अभ्यागत कक्ष : 25