पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या वाव-थराद येथे विविध विकासकामांच्या उद्धाटना प्रसंगी केलेल्या भाषणाची काही क्षणचित्रे केली सामायिक
Posted On:
01 APR 2026 11:15AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बनासकांठा जिल्ह्यातील 'वाव-थराद' येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी उत्तर गुजरातसाठी सुमारे 20,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले, तसेच काही प्रकल्पांची पायाभरणीही केली. नवरात्रीचा पवित्र उत्सव नुकताच संपन्न झाला असून, हा दिवस भगवान महावीर जयंतीचाही आहे, याची दखल घेत पंतप्रधानांनी, 'माँ अंबाजी' आणि 'भगवान श्री धरणीधरजी' यांना वंदन केले.
एक्स या सामाजिक माध्यमांवरील आपल्या पोस्ट्सच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले,
"आजची वाव-थरादची भेट अधिक विशेष आहे, कारण मी डीसा हवाई तळावर उतरलो..."
“काँग्रेसच्या राष्ट्रीय सुरक्षेबद्दलच्या उदासीनतेमुळे डीसा विमानतळ प्रकल्प दीर्घकाळ रखडला होता. आम्ही तो प्राधान्याने पूर्ण केला आहे, जो संपूर्ण प्रदेश आणि देशासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.”
“वाव-थरादसहित या संपूर्ण परिसराच्या माझ्या मनात अनेक आठवणी आहेत. येथील लोकांनी, विशेषतः माता आणि भगिनींनी दिलेले दाखवलेले प्रेम मी कधीही विसरू शकत नाही!”
“आज सौरऊर्जेच्या क्षेत्रात गुजरात आघाडीवर आहे. तो दिवस दूर नाही, जेव्हा आपले राज्य जगात नवीकरणीय ऊर्जेचे एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येईल.”
“काँग्रेस राजवटीत अराजकता आणि गरिबीशी झगडणारा उत्तर गुजरात आता विकासाची नवी गाथा लिहीत आहे. आम्ही येथे करत असलेल्या कामाचा वाव-थराद, बनासकांठा, पाटण आणि मेहसाणा या भागांना मोठा फायदा होईल.”
“युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटाच्या काळातही काँग्रेस पक्ष भारताचा द्वेष करणाऱ्या परकीय शक्तींची भाषा बोलत आहे, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आपण त्यांच्या कारस्थानांपासून सावध राहिले पाहिजे.”
***
नेहा कुलकर्णी/वैभवी जोशी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2248010)
अभ्यागत कक्ष : 9