संसदीय कामकाज मंत्रालय
सल्लागार समित्यांच्या बैठकांचे सुलभ व्यवस्थापन आणि देखरेखीसाठी संसदीय कार्य मंत्रालयाने सुरु केले CCMS (Consultative Committee Management System) पोर्टल
Posted On:
01 APR 2026 2:52PM by PIB Mumbai
सल्लागार समित्यांच्या बैठकांचे सुलभ व्यवस्थापन आणि देखरेखीसाठी संसदीय कार्य मंत्रालयाने CCMS (Consultative Committee Management System) हे पोर्टल सुरु केले आहे. या पोर्टलमुळे सल्लागार समित्यांच्या कामकाजात अधिक सुलभता आणि सुनियोजितपणा यायला मदत झाली आहे. संसदेचे सदस्य आणि सरकार यांच्यात अनौपचारिक चर्चेसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, या हेतूने या सल्लागार समित्या स्थापन केल्या गेल्या आहेत.
सल्लागार समित्यांची घटना, कार्ये आणि कार्यपद्धती यासंबंधीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, संसदेचे सदस्य हे, संसदेत ज्या विषयांवर चर्चा होऊ शकते अशा कोणत्याही विषयावर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र आहेत. मात्र, सल्लागार समितीच्या बैठकीत घडलेल्या कोणत्याही घटनेचा किंवा चर्चेचा संदर्भ संसदेच्या कोणत्याही सभागृहांमध्ये देणे यात अपेक्षित नाही. हे बंधन सरकार आणि संसदेचे सदस्य अशा दोघांनाही लागू आहे. संसदेच्या सदस्यांची अशा बैठकींमधील उपस्थिती वाढावी या उद्देशाने, सल्लागार समित्यांच्या बैठकींशी संबंधित माहिती सदस्यांना प्रत्यक्ष नोटिसीद्वारे तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे कळवली जाते. यासोबतच संबंधीत मंत्रालयाचे अधिकारी देखील या प्रक्रियेचा पाठपुरावा करत असतात.
केंद्रीय विधी आणि न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच, संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
***
शैलेश पाटील/तुषार पवार/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2247736)
अभ्यागत कक्ष : 13