संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण मंत्रालयाकडून तुंगुस्का हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली आणि P8I विमानांच्या (डेपो स्तरीय) तपासणीसाठी 858 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी

प्रविष्टि तिथि: 27 MAR 2026 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 मार्च 2026

 

संरक्षण मंत्रालयाने तुंगुस्का हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची खरेदी आणि P8I लांब पल्ल्याच्या सागरी टेहळणी विमानांच्या तपासणीसाठी (डेपो स्तरीय) एकूण 858 कोटी रुपयांच्या करारांवर स्वाक्षरी केली आहे. हे करार 27 मार्च 2026 रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य भवन -2 येथे करण्यात आले.

तुंगुस्का हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली

भारतीय लष्करासाठी 445 कोटी रुपये मूल्याच्या तुंगुस्का हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीच्या खरेदीचा करार, संरक्षण सचिव  राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत रशियाच्या जेएससी रोसोबोरोनेक्सपोर्ट सोबत करण्यात आला. ही अत्याधुनिक क्षेपणास्त्रे विमाने, ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रांसह इतर हवाई धोक्यांविरुद्ध भारताची बहुस्तरीय हवाई संरक्षण क्षमता वाढवतील. या करारामुळे भारत-रशिया धोरणात्मक संरक्षण भागीदारी अधिक मजबूत होईल.

P8I विमानांची तपासणी

भारतीय नौदलाच्या P8I लांब पल्ल्याच्या सागरी टेहळणी विमानांच्या तपासणीसाठी (डेपो स्तरीय) 413 कोटी रुपये मूल्याच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. 'बाय इंडियन'  श्रेणी अंतर्गत 100% स्वदेशी सामग्रीसह हा करार बोईंगची पूर्ण मालकीची भारतीय उपकंपनी असलेल्या बोईंग इंडिया डिफेन्स प्रायव्हेट लिमिटेड सोबत करण्यात आला. हा करार देशांतर्गत एमआरओ (देखभाल, दुरुस्ती  आणि ओव्हरहॉल) सुविधेत P8I ताफ्याची डेपो स्तरावरील देखभाल सुनिश्चित करेल, जे भारत सरकारच्या 'आत्मनिर्भर भारत' आणि 'मेक-इन-इंडिया' प्रतिबद्धतेशी सुसंगत आहे.

 

* * *

निलिमा चितळे/शैलेश पाटील/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2246260) आगंतुक पटल : 74
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Telugu