विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि धोरणात्मक गरजा पूर्ण करण्यासाठी भारत अत्यावश्यक खनिजांच्या अन्वेषणाचा विस्तार करणार असून देशांतर्गत मजबूत मूल्यसाखळ्या निर्माण करणार आहे: डॉ. जितेंद्र सिंह

Posted On: 26 MAR 2026 3:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 मार्च 2026

 

भारत अत्यावश्यक खनिजांच्या अन्वेषणाचा विस्तार करण्याच्या, स्टार्टअप-आधारित खाणकाम परिसंस्था निर्माण करण्याच्या तसेच आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी देशांतर्गत मजबूत मूल्यसाखळ्या उभारत असल्याचे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. 

जीपीओए कॉम्प्लेक्स येथे आयोजित 'नॅशनल मिनरल एक्सप्लोरेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट' (एनएमईटी) च्या नियामक मंडळाच्या बैठकीला संबोधित करताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी अन्वेषणाला गती देणे, देशांतर्गत क्षमता बळकट करणे आणि महत्त्वपूर्ण खनिज क्षेत्रात सहभाग वाढवणे यासाठीचे प्राधान्यक्रम मांडले.

केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री तथा ''नॅशनल मिनरल एक्सप्लोरेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट’'च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष जी. किशन रेड्डी यांनी या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले. या बैठकीला खाण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, 'सीएस आय आर–खनिज आणि पदार्थ तंत्रज्ञान संस्थे'चे (सीएस आय आर - आय एम एम टी) संचालक, 'अणु खनिज संचालनालया'चे संचालक, 'अणु ऊर्जा विभागा'चे प्रतिनिधी, अन्वेषण संस्थांचे अधिकारी तसेच महाराष्ट्र, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांसह विविध राज्य सरकारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की विशेषतः लिथियम आणि इतर अत्यावश्यक खनिजांच्या अन्वेषणाचा वेग हा वाढती जागतिक मागणी आणि भारताच्या धोरणात्मक गरजा यांच्याशी सुसंगत असणे आवश्यक आहे. त्यांनी राजस्थानमधील 'सिवाना पट्टा' आणि जम्मू-काश्मीरमधील 'सलाल-हैमना ब्लॉक' यांसारख्या क्षेत्रांमध्ये सुरू असलेल्या कामाचा उल्लेख केला, आणि अशाच प्रकारच्या अधिकाधिक संभाव्य क्षेत्रांमध्ये स्वदेशी अन्वेषण प्रयत्नांचा विस्तार करण्याचे आवाहन केले.

   

स्थानिक सहभागाबद्दल बोलताना मंत्री म्हणाले की ज्या भागांमध्ये अन्वेषण सुरू आहे, तिथे खासदार आणि आमदारांसह लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेतले जाऊ शकते. यामुळे स्थानिक समुदायांमध्ये जागरूकता निर्माण होण्यास आणि प्रकल्पांची अंमलबजावणी अधिक सुरळीतपणे होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.

एन एम ई टीच्या कामकाजाचा आढावा घेताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी कार्यक्षमता आणि निकाल सुधारण्याच्या उद्देशाने आखलेल्या वार्षिक योजना, प्रकल्प मंजुरी, आर्थिक साहाय्य आणि संस्थात्मक यंत्रणा यांवर चर्चा केली. त्यांनी नमूद केले की एन एम ई टीने सातत्याने नाविन्याला पाठिंबा देणे, अन्वेषण संस्थांना सहकार्य करणे, राज्यांना प्रोत्साहन देणे आणि अत्यावश्यक खनिजांच्या प्राप्तीसाठीच्या पथदर्शी प्रकल्पांना चालना देणे सुरू ठेवले पाहिजे. त्यांनी असेही सांगितले की अन्वेषण क्षेत्रांमध्ये जागृती निर्माण करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून स्थानिक समुदायांना खनिज विकासाचे दीर्घकालीन फायदे समजू शकतील.

खाण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एनएमईटीच्या उपक्रमांविषयी अद्ययावत माहिती सादर केली, ज्यामध्ये अन्वेषण प्रकल्पांमधील प्रगती, स्टार्टअप उपक्रम, प्रकल्प मंजुरी यंत्रणा आणि समन्वय व कार्यक्षमता सुधारण्यासाठीच्या उपाययोजना यांचा समावेश होता.

 

* * *

माधुरी पांगे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2245636) अभ्यागत कक्ष : 27