रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनएचएआय प्रायोजित 'राजमार्ग इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट' आयपीओ 24 मार्च 2026 रोजी बीएसईमध्ये सूचीबद्ध होणार

Posted On: 23 MAR 2026 6:04PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 मार्च 2026

 

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय-) द्वारा प्रायोजित राजमार्ग इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (आरआयआयटी) चा पहिला पब्लिक इश्यू 24 मार्च 2026 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई)वर सूचिबद्ध होणार  आहे. या कार्यक्रमाला रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासह रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि एनएचएआयच्या वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

आयपीओला गुंतवणूकदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून तो जवळपास 14 पटींनी ओव्हरसबस्क्राईब झाला, त्यामध्ये विविध प्रकारच्या गुंतवणूकदारांचा सहभाग होता. हा प्रचंड प्रतिसाद गुंतवणूकदारांचा भारताच्या विकासाच्या वाटचालीवर, येथील वित्तीय बाजारांच्या सामर्थ्यावर, तसेच कार्यक्षम भांडवल वसुली आणि पायाभूत सुविधांच्या जलद विकासाच्या उद्देशाने भारत सरकारच्या पारदर्शक आणि सुधारणा-केंद्रित मालमत्ता मुद्रीकरण कार्यक्रमावर दृढ विश्वास असल्याचे अधोरेखित करतो.

एनएचएआय-प्रायोजित राजमार्ग इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट ट्रस्टची रचना, कार्यरत राष्ट्रीय रस्ते मालमत्तांचे महत्व  तसेच विशेषतः किरकोळ व स्थानिक गुंतवणूकदारांसाठी एक उच्च-गुणवत्तेची, दीर्घकालीन गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने करण्यात आली आहे. हा उपक्रम राष्ट्रीय रस्ते क्षेत्रात सार्वजनिक सहभाग वाढवण्याच्या आणि देशातील पायाभूत सुविधा वित्तपुरवठा परिसंस्थेला अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

 

* * *

सुषमा काणे/मंजिरी गानू/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2244083) अभ्यागत कक्ष : 15