खते विभाग
azadi ka amrit mahotsav

खत आयातीत वाढ; पुरेसा पुरवठा सुनिश्चित

Posted On: 20 MAR 2026 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 मार्च 2026

 

केंद्र सरकार राज्यांशी सल्लामसलत करून कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने केलेल्या मागणीच्या मूल्यांकनावर आधारित, खतांची पुरेशी आणि वेळेवर उपलब्धता होईल याची खात्री करते. खतांची गरज ठरवताना एकूण पेरणी क्षेत्र, सिंचनाखालील क्षेत्र, मागील तीन हंगामांतील वापराचा कल तसेच जमिनीचे आरोग्य आणि सुपीकतेनुसार पीकनिहाय शिफारस केलेल्या खतांचे प्रमाण इत्यादी बाबी विचारात घेतल्या जातात. या अंदाजित गरजेच्या आधारे, खत विभाग मासिक पुरवठा योजना जारी करून राज्यांना खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देतो.

याशिवाय, खतांची मागणी (गरज) आणि देशांतर्गत उत्पादन यांमधील तफावत भरून काढण्यासाठी वेळेआधी आयात केली जाते , जेणेकरून देशात खते पुरेशा प्रमाणात आणि वेळेवर उपलब्ध होतील.

त्या अनुषंगाने, एप्रिल-जानेवारी 2025-26 आणि एप्रिल-जानेवारी 2024-25 या कालावधीत युरिया आणि डीएपी (DAP) खतांचे देशांतर्गत उत्पादन, आयात आणि विक्री यासंबंधीची माहिती खालीलप्रमाणे आहे:

Fertilizer

Domestic Production

Imports

Sales

 

2024-25

2025-26

2024-25

2025-26

2024-25

2025-26

Urea

258.48

251.26

48.70

89.30

345.86

352.61

DAP

34.25

33.71

43.09

60.16

90.31

91.36

मात्र, भारत सरकारने 'खत नियंत्रण आदेश, 1985' अंतर्गत विविध 'नॅनो नायट्रोजन खते' —उदा. नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी—अधिसूचित केली आहेत.

एप्रिल-जानेवारी 2025-26 या कालावधीत नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी यांची विक्री अनुक्रमे 182.50 लाख आणि 144.93 लाख बाटल्या (500 मिली समतुल्य) इतकी झाली आहे.

 

* * *

निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2243105) अभ्यागत कक्ष : 19