अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेडने महिला शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी 'कृषी सखी' उपक्रम केला सुरू

Posted On: 18 MAR 2026 10:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 मार्च 2026

संयुक्त राष्ट्रांनी अन्न आणि कृषी संघटनेच्या माध्यमातून 2026 हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष' म्हणून घोषित केल्याच्या अनुषंगाने, ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड (एआयसी) ने महिला शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी आणि सर्वसमावेशक विकास साधण्याच्या दिशेने काम करण्यासाठी 'कृषी सखी' उपक्रम सुरू केला आहे.

मुख्य कार्यालय आणि प्रादेशिक कार्यालयांमध्ये आयोजित या सुनियोजित मासिक उपक्रमांच्या माध्यमातून,शाश्वत जागरूकता निर्माण करणे, कृषी आणि पीक विमा क्षेत्रात महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देणे आणि भारतातील कृषी क्षेत्र मजबूत करण्यासाठी त्यांच्या योगदानाचा गौरव करणे हा एआयसी चा उद्देश आहे.

 

जानेवारी 2026 मध्ये, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या उपक्रमाबद्दल प्राथमिक जागरूकता निर्माण करण्यासाठी एक प्रस्तावनापर  व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला. फेब्रुवारीमध्ये, एआयसीच्या मुख्य कार्यालयात, कृषी क्षेत्रातील महिलांसाठी एकजुटता , लवचिकता आणि सामूहिक समर्थनाचे प्रतीक असलेल्या हॅशटॅग #AICforHer  दर्शवणाऱ्या कार्डबोर्डसह एआयसीच्या सर्व कर्मचाऱ्यांसोबत एक छोटा वॉकेथॉन आयोजित करण्यात आला होता. मार्च महिन्यात, महिला शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना आणि लाभांवर भर देत , तळागाळातील स्तरावर कार्यशाळा आणि जागरूकता कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये आयोजित केलेल्या उपक्रमांचे व्हिडिओ येथे पाहता येतील:

https://www.instagram.com/reel/DUKYspfE6uE/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRl

https://www.instagram.com/reel/DVTCHykkycb/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzR

देशभरातील महिला शेतकऱ्यांना गौरवण्यासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी आणि सहभागी करून घेण्यासाठी, या उपक्रमांतर्गत वर्षाच्या उर्वरित महिन्यांसाठी संबंधित लेख आणि मुलाखतींचे प्रकाशन, ग्रामीण भागातील स्वच्छता आणि आरोग्याविषयी जनजागृती मोहीम (विशेषतः महिला शेतकरी आणि ग्रामीण कुटुंबांना लक्ष्य करून), इत्यादींसारखे  अनेक उपक्रम नियोजित  आहेत.


निलीमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2242225) अभ्यागत कक्ष : 22
Read this releasein: English , हिन्दी