रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
केंद्रीय मंत्रिमंडळाने उत्तर प्रदेशातील बाराबंकी ते बहराइच (101.515 किमी) या दरम्यान, 'हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल'वर आधारित चौपदरी नियंत्रित प्रवेश राष्ट्रीय महामार्ग-927 च्या बांधकामासाठी 6969.04 कोटी रुपयांच्या खर्चाला दिली मंजुरी
Posted On:
18 MAR 2026 6:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 मार्च 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने, उत्तर प्रदेशातील बाराबंकी ते बहराइच (101.515 किमी) या दरम्यान चौपदरी नियंत्रित प्रवेश असलेल्या राष्ट्रीय महामार्ग-927 च्या बांधकामाला 'हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल' (एचएएम) अंतर्गत, 6969.04 कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे.
उत्तर प्रदेशातील एनएच-927 च्या बाराबंकी-बहराइच टप्प्याच्या प्रस्तावित सुधारणेमुळे, बाराबंकी आणि बहराइच जिल्ह्यांमधील रस्त्यांच्या रचनेतील गंभीर त्रुटी, तीव्र वळणे आणि नागरी वस्तीच्या क्षेत्रांमधील वाहतूक कोंडी या समस्यांचे निराकरण होईल. सलग सेवा रस्त्यांसह (सर्व्हिस रोड) नियंत्रित प्रवेश ' चौपदरी महामार्ग म्हणून रचना करण्यात आलेला हा प्रकल्प प्रमुख लोकवस्त्यांना वळसा घालून जाईल; यामुळे प्रवासाचा सरासरी वेग वाढेल. या प्रवासाला लागणारा वेळ सुमारे एका तासाने कमी होईल. रस्त्यांवरील एकूण सुरक्षा, इंधन कार्यक्षमता आणि वाहनांच्या परिचालन खर्चाच्या दृष्टीने सुधारणा होईल. परिणामी, यामुळे प्रादेशिक गतिशीलता आणि सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल.
या प्रकल्पामुळे संपूर्ण उत्तर प्रदेशातील प्रमुख आर्थिक, सामाजिक आणि वाहतूक केंद्रांना अखंडित जोडणी- संपर्क यंत्रणा प्रदान होईल. याव्यतिरिक्त, ही सुधारित मार्गिका तीन आर्थिक केंद्रे, दोन सामाजिक केंद्रे आणि 12 वाहतूक केंद्रांशी जोडली जाऊन 'बहु-माध्यमी एकत्रीकरणाचे' काम अधिक बळकट करणार आहे. यामुळे ' रुपैडिहा लँड पोर्ट' आणि विविध विमानतळांशी अधिक प्रभावी बहु-माध्यमाव्दारे जोडणी उपलब्ध होईल. त्याचा फायदा या संपूर्ण प्रदेशातून वस्तू आणि प्रवाशांची वाहतूक अधिक वेगाने होण्यासाठी होईल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, नेपाळगंज सीमेमार्गे भारत आणि नेपाळ यांच्या दरम्यान एक अत्यंत महत्त्वाचा 'सीमापार व्यापार आणि वाहतूक मार्गिका' धोरणात्मकदृष्ट्या प्रस्थापित होईल. यामुळे ' रुपैडिहा लँड पोर्ट'पर्यंतची पोहोच लक्षणीयरीत्या सुधारेल. या प्रकल्पामुळे बहराइच आणि श्रावस्ती यांसारख्या दुर्गम जिल्ह्यांमधील जोडणी सुधारेल, 'पीएम गतिशक्ती' अंतर्गत येणाऱ्या आर्थिक आणि वाहतूक केंद्रांना बळ देईल, तसेच कृषी-व्यापार, पर्यटन, सीमापार वाणिज्य आणि प्रादेशिक गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल.
मार्गिकेचा नकाशा –

प्रकल्पाचा तपशील:
|
वैशिष्ट्य
|
तपशील
|
|
प्रकल्पाचे नाव
|
बाराबंकी ते बहराइच दरम्यानचा चौपदरी प्रवेश-नियंत्रित राष्ट्रीय महामार्ग-927
|
|
मार्गिका
|
लखनौ – रुपैडिहा
|
|
लांबी (कि.मी.)
|
101.515
|
|
एकूण बांधकाम खर्च (कोटी रूपये)
|
3485.49
|
|
भूसंपादन खर्च (कोटी रुपये)
|
1574.85
|
|
एकूण भांडवली खर्च (कोटी रुपये)
|
6969.04
|
|
कामाची पद्धत
|
हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल (एचएएम)
|
|
बायपाय रस्ता
|
48.28 कि.मी.
|
|
जोडले जाणारे मुख्य रस्ते
|
राष्ट्रीय महामार्ग – एनएच-27, एनएच -330B आणि एनएच -730
राज्य महामार्ग – -13 आणि राज्य महामार्ग -30B
|
|
जोडली जाणारी आर्थिक / सामाजिक / वाहतूक केंद्रे
|
विमानतळ: लखनौ आणि श्रावस्ती
रेल्वे स्थानके: बाराबंकी, रसौली, जहांगीराबाद, रफीनगर, बिंदौरा, बुरहवाल, चौकघाट, घाघराघाट, जरवल आणि बहराइच
भू-बंदर : रुपैडिहा
आर्थिक केंद्रे: 1 सेझ (विशेष आर्थिक क्षेत्र) आणि 2 मेगा फूड पार्क
सामाजिक केंद्रे: 02 आकांक्षित जिल्हे
|
|
जोडली जाणारी प्रमुख शहरे / नगरे
|
बाराबंकी, रामनगर, जरवल, कैसरगंज, कुंडसार, फखरपूर आणि बहराइच
|
|
रोजगार निर्मितीची क्षमता
|
36.54 लाख मनुष्य-दिवस (प्रत्यक्ष) आणि 43.04 लाख मनुष्य-दिवस (अप्रत्यक्ष)
|
|
आर्थिक वर्ष-2028 पर्यंतची वार्षिक सरासरी दैनंदिन वाहतूक
|
अंदाजे 28,557 (पॅकेज-1) आणि 21,270 (पॅकेज-2) प्रवासी कार युनिट्स (पीसीयू)
|
निलीमा चितळे/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2242015)
अभ्यागत कक्ष : 12