संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय तटरक्षक दलासाठी दोन नव्या पिढीच्या अपतटीय गस्तीनौकांच्या बांधकामाला प्रारंभ

Posted On: 18 MAR 2026 4:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 मार्च 2026

नव्या पिढीच्या सहा अपतटीय  गस्तीनौकांपैकी (एनजीओपीव्ही) दुसरे आणि तिसरे जहाज यार्ड 16402 आणि  16403 च्या बांधकामाचा शुभारंभ सोहळा 17, मार्च 2026 रोजी मेसर्स वायएमपीएल , रत्नागिरी येथे पार पडला.

5,000 सागरी  मैलांच्या पल्ल्यासह, ही जहाजे 23 नॉट्सचा कमाल वेग गाठण्यास सक्षम असतील. 117  मीटर लांबीच्या आणि 11 अधिकारी व 110 कर्मचारी क्षमता असलेल्या या जहाजांमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि प्रगत तंत्रज्ञान प्रणालींचा समावेश असेल, ज्यात एआय-आधारित सूचक देखभाल प्रणाली , रिमोट पायलेटेड ड्रोन, इंटिग्रेटेड ब्रिज सिस्टीम (IBS) आणि इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टीम (IPMS) यांचा समावेश आहे.

सरकारच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेच्या धर्तीवर , एमडीएलद्वारे 'बाय (इंडियन-आयडीडीएम)' श्रेणीअंतर्गत या जहाजाची रचना, विकास आणि बांधकाम स्वदेशी बनावटीने केले जात आहे. नवीन पिढीच्या सहा गस्तीनौकांच्या बांधणीचा करार 20, डिसेंबर 2023 रोजी करण्यात आला होता .

हा उपक्रम भारतीय तटरक्षक दलाच्या  परिचालन क्षमता वाढवण्याच्या  आणि किनारी सुरक्षा मजबूत करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे. एनजीओपीव्हीच्या नवीन ताफ्याच्या समावेशामुळे भारताच्या सागरी हितांचे रक्षण करण्यामध्ये भारतीय तटरक्षक दलाची भूमिका अधिक मजबूत होईल.

हा सोहळा  आयजी सुधीर साहनी, टीएम, डीडीजी (एम अँड एम) यांच्या अध्यक्षतेखाली आणि  भारतीय तटरक्षक दल आणि एमडीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.


निलीमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2241776) अभ्यागत कक्ष : 29