कृषी मंत्रालय
सरकारने देशभरात 10,000 शेतकरी उत्पादक संघटनांच्या नोंदणीचा महत्वाचा टप्पा केला साध्य
Posted On:
17 MAR 2026 9:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 मार्च 2026
सरकार, केंद्रीय क्षेत्र योजने अंतर्गत ‘10,000 शेतकरी उत्पादक संघटनांची (एफपीओ) स्थापना आणि प्रोत्साहन’ यासाठी एक योजना राबवत आहे. या योजनेंतर्गत 1 मार्च 2026 पर्यंत देशभरात 10,000 शेतकरी उत्पादक संघटनांची (एफपीओ) नोंदणी झाली.
1 मार्च 2026 पर्यंत, 10,000 एफपीओ योजनेंतर्गत,100% महिला सदस्य असलेल्या 1175 एफपीओ ची नोंदणी झाली.
1 मार्च 2026 पर्यंत, 10,000 एफपीओ योजनेंतर्गत देशभरात 23.55 लाख महिला शेतकऱ्यांची नोंदणी झाली.
कृषी आणि कृषक कल्याण राज्यमंत्री भागीरथ चौधरी यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
निलीमा चितळे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2241510)
अभ्यागत कक्ष : 21