कृषी मंत्रालय
जागतिक नारळ उत्पादनात भारत आघाडीवर; वर्ष 2026-27 च्या अर्थसंकल्पात नारळ प्रोत्साहन योजनेची सरकारची घोषणा
Posted On:
17 MAR 2026 8:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 मार्च 2026
भारत हा जगातील सर्वात मोठा नारळ उत्पादक देश असून, जागतिक नारळ उत्पादनात त्याचा वाटा 30.37% आहे. जागतिक स्तरावर, नारळाची लागवड सुमारे 12390 हजार हेक्टर क्षेत्रावर केली जाते, त्यापैकी अंदाजे 2165.20 हजार हेक्टर क्षेत्र भारतात आहे. देशात दरवर्षी सुमारे 21373.62 दशलक्ष नारळांचे उत्पादन होते. सरासरी उत्पादकता प्रति हेक्टर सुमारे 9871 नारळ असून देशाच्या कृषी उत्पादनात या पिकाचे महत्त्वपूर्ण योगदान यातून प्रतिबिंबित होते. सुमारे 10 दशलक्ष शेतकऱ्यांसह जवळपास 30 दशलक्ष लोक आपल्या उपजीविकेसाठी नारळावर अवलंबून आहेत.
केंद्र सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये नारळ प्रोत्साहन योजनेची घोषणा केली आहे. देशातील प्रमुख नारळ उत्पादक राज्यांमध्ये नारळ उत्पादनातील स्पर्धात्मकता आणखी वाढवण्यासाठी, जुन्या आणि अनुत्पादक झाडांच्या जागी नवीन रोपे/झाडे/जाती लावण्यासारख्या विविध उपाययोजनांद्वारे उत्पादन वाढवणे आणि उत्पादकता सुधारणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हा उपक्रम उच्च-मूल्य कृषीसाठी असलेल्या 350 कोटी रुपयांच्या व्यापक तरतुदीचा एक भाग आहे, ज्यामध्ये नारळ, काजू आणि कोको यांचा समावेश आहे. मात्र ही योजना अद्याप मसुदा स्वरूपात असल्यामुळे राज्य/केंद्रशासित प्रदेश-निहाय निधीची मंजुरी आणि वापर याला अद्याप अंतिम रूप दिलेले नाही.
कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री भागीरथ चौधरी यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
निलीमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2241465)
अभ्यागत कक्ष : 29