मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कल्याणकारी योजनेंतर्गत नोंदणी करण्यात आलेल्या मच्छिमारांची माहिती

Posted On: 10 MAR 2026 3:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 मार्च 2026

केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्रालयातील मत्स्यपालन विभागाने गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत (2022-23 ते 2024-25)विद्यमान पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेंतर्गत (पीएमएमएसवाय) कल्याणकारी उपाययोजनांसह 13,924.24 कोटी रुपये मूल्याच्या मत्स्यव्यवसाय विकासविषयक प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. यामध्ये 6,415.87 कोटी रुपये इतका केंद्राचा वाटा असून त्यापैकी 3,535.03 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. देशभरातील मच्छिमारांच्या कल्याणावर अधिक लक्ष भर देत आणि त्यांच्या उत्पन्नात सुधारणा घडवून आणत पंतप्रधान मत्स्य संपदा ही योजना (पीएमएमएसवाय) या मस्त्यव्यवसाय क्षेत्राच्या समग्र विकासाला चालना देण्यात देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गेल्या 3 वर्षांच्या काळात, पीएमएमएसवायअंतर्गत मंजूर झालेले प्रकल्प तसेच केंद्राने त्यांच्यासाठी जारी केलेला निधी यांचे राज्यनिहाय तपशील परिशिष्ट I मध्ये दिले असून कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजिटल मंचाअंतर्गत (एनएफडीपी) नोंदणीकृत मच्छिमारांचे तपशील परिशिष्ट-II मध्ये देण्यात आले आहेत.

(c): केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, किनारपट्टी भागातील मच्छिमार समुदाय तसेच इतर स्थानिक समुदायांच्या उपजीविकेच्या संरक्षणाची खात्री करून घेत वैज्ञानिक तत्वांवर आधारित शाश्वत विकासाला चालना देत किनारपट्टीलगतचा परिसर आणि सागरी क्षेत्रांतील वैशिष्ट्यपूर्ण वातावरणाचे जतन आणि संरक्षण करण्याच्या दृष्टीने सीआरझेड अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत. सदर सीआरझेड अधिसूचना मच्छिमार समुदायाच्या उपजीविकेचे संरक्षण करण्याची तरतूद करतात. या भागातील औद्योगिक, व्यावसायिक संरचनांचे बांधकाम तसेच निवासी इमारतींची देखील उभारणी यासाठी सीआरझेड अधिसूचनेत कठोर नियम निश्चित करण्यात आले असून या अधिसूचना सीआरझेडच्या विकास मनाई क्षेत्रात (एनडीझेड) देखील सुयोग्य तरतुदींच्या माध्यमातून मच्छिमार समुदायाच्या हिताचे रक्षण करतात. मच्छिमार समुदायाच्या मासे सुकवण्याचे क्षेत्र, जाळी दुरुस्ती क्षेत्र, पारंपरिक जहाजबांधणी क्षेत्र, बर्फाचे कारखाने, बर्फाचा चुरा करणारी संयंत्रे, लिलावासाठीचा भाग, मासे प्रक्रिया सुविधा इत्यादींसारख्या व्यवसायांशी संबंधित सुविधांना एनडीझेड मध्ये परवानगी देण्यात आली आहे. तसेच मच्छिमार आणि इतर स्थानिक समुदायांना त्यांचे पारंपरिक अधिकार म्हणून एनडीझेड मधील निवासी एककांची दुरुस्ती अथवा पुनर्बांधणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

परिशिष्ट-I

: पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेंतर्गत गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत (2022-23 ते 2024-25) मंजूर झालेल्या प्रकल्पांचा एकूण खर्च तसेच केंद्राने त्यांच्यासाठी जारी केलेला निधी यांचे राज्यनिहाय तपशील

(रक्कम लाख रुपयांमध्ये)

(Rs.in lakh)

Sl. No

State/UT

Total Project Cost

Central Share

State Share

Beneficiary Share

Funds Released

1

A & N Island

2886.75

1684.25

0.00

1202.50

500.00

2

Andhra Pradesh

162788.20

31720.00

110588.40

20480.40

20604.68

3

Arunachal Pradesh

15411.39

10739.09

1192.96

3479.34

10069.97

4

Assam

33948.88

20184.79

2820.86

10905.21

11043.02

5

Bihar

27501.48

8817.39

5828.27

12792.82

2641.74

6

Chhattisgarh

71304.45

24333.23

16057.49

30512.73

17123.00

7

Daman & Diu &DNH

12885.69

12885.69

0.00

0.00

0.00

8

Delhi

0.00

0.00

0.00

0.00

0.00

9

Goa

3127.00

1187.49

786.33

1146.18

2527.15

10

Gujarat

47334.50

19133.76

12755.84

15444.90

3742.14

11

Haryana

60087.75

21342.86

16005.24

22739.65

9562.64

12

Himachal Pradesh

8499.98

4616.16

545.76

3335.98

3232.64

13

Jammu & Kashmir

9621.87

5043.28

0.00

4578.59

5479.56

14

Jharkhand

22065.66

7916.91

5028.59

8802.16

3341.44

15

Karnataka

66378.62

24444.39

16599.28

25334.96

13382.42

16

Kerala

99446.51

44925.47

34947.29

19573.77

25804.29

17

Ladakh

2654.60

1604.76

0.00

1049.84

1014.02

18

Lakshadweep

2239.00

1343.40

99.20

796.40

0.00

19

Madhya Pradesh

59588.06

20579.82

13175.98

24897.27

14316.19

20

Maharashtra

98160.96

37488.28

27547.59

32678.09

22751.66

21

Manipur

16352.20

7605.42

845.05

7901.75

1000.00

22

Meghalaya

9826.40

5570.31

618.93

3637.17

3039.84

23

Mizoram

8380.80

4523.74

523.65

3333.41

4393.58

24

Nagaland

11718.58

7913.83

862.31

2925.44

5185.25

25

Odisha

67796.00

29341.10

23020.24

15434.70

18381.21

26

Puducherry

30367.18

26290.88

0.00

4074.30

4231.00

27

Punjab

7877.25

2475.70

1650.46

3751.09

2128.08

28

Rajasthan

4175.00

1447.52

964.90

1762.50

148.81

29

Sikkim

5039.28

3176.10

354.55

1508.63

2763.42

30

Tamil Nadu

79530.25

32292.84

34592.83

12644.58

10419.87

31

Telangana

19451.49

6836.46

4394.92

8220.12

1336.47

32

Tripura

18798.51

11345.22

1291.25

6141.05

4137.43

33

Uttar Pradesh

70165.40

22325.57

14888.71

32951.11

14232.77

34

Uttarakhand

20874.47

10756.35

1195.15

8922.97

12444.50

35

West Bengal

54439.44

22554.68

12848.30

19036.45

5507.70

36

Other Institutes

36400.00

21840.00

0.00

0.00

49780.40

37

Insurance Activities

6410.00

6410.00

0.00

3960.00

6410.00

38

PMMKSSY

1193.07

1193.07

0.00

0.00

1193.07

 

Total (A)

1274726.67

523889.81

362030.31

371996.05

313869.96

 

Central Sector Proposals (B)

117697.33

117697.33

0.00

115.55

39632.60

 

Grand Total (A+B)

1392424.00

641587.14

362030.31

331693.14

353502.56

*****

परिशिष्ट-II

राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजिटल मंचाअंतर्गत (एनएफडीपी) नोंदणीकृत मच्छिमारांचे राज्य-निहाय तपशील

Sl. No

Name of the States/UTs

Total Registrations

1

Andaman and Nicobar Islands

4,535

2

Andhra Pradesh

2,79,578

3

Arunachal Pradesh

4,227

4

Assam

2,44,469

5

Bihar

1,72,724

6

Chandigarh

219

7

Chhattisgarh

58,951

8

Dadra Nagar Haveli and Daman and Diu

4,789

9

Delhi

940

10

Goa

2,834

11

Gujarat

1,15,682

12

Haryana

8,291

13

Himachal Pradesh

12,040

14

Jammu and Kashmir

30,853

15

Jharkhand

41,591

16

Karnataka

2,00,203

17

Kerala

2,51,378

18

Ladakh

101

19

Lakshadweep

3,292

20

Madhya Pradesh

89,445

21

Maharashtra

2,76,431

22

Manipur

25,412

23

Meghalaya

23,951

24

Mizoram

4,601

25

Nagaland

9,436

26

Odisha

2,39,363

27

Puducherry

14,544

28

Punjab

4,704

29

Rajasthan

6,032

30

Sikkim

2,031

31

Tamil Nadu

3,56,673

32

Telangana

2,63,054

33

Tripura

1,01,424

34

Uttar Pradesh

1,22,312

35

Uttarakhand

10,730

36

West Bengal

74,005

 

Grand Total

30,60,845

लोकसभेत विचारल्या गेलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन तसेच दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ लालन सिंह यांनी ही माहिती दिली.

 

नेहा कुलकर्णी/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2237498) अभ्यागत कक्ष : 12