आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेचा 49 वा वार्षिक दिन सोहळा साजरा
भारत डिजिटल आरोग्य पायाभूत सुविधांचा विस्तार करत आहे, आरोग्य आणि कल्याण केंद्रे मजबूत करत आहे, लसीकरण वाढवत आहे आणि रोग निरिक्षण प्रणाली सक्षम करत आहे: जाधव
Posted On:
09 MAR 2026 9:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मार्च 2026
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेने (एनआयएचएफडब्ल्यू) आज नवी दिल्लीतील मुनिरका येथील एनआयएचएफडब्ल्यू सभागृहात आपला 49 वा वार्षिक दिन साजरा केला. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री तसेच आयुष मंत्रालय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले.


उपस्थितांना संबोधित करताना प्रतापराव जाधव यांनी सार्वजनिक आरोग्य संस्थांना बळकटी देण्याचे महत्त्व अधोरेखित केले तसेच कुशल आरोग्य व्यावसायिक तयार करण्यात आणि राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांना पाठबळ देण्यात एनआयएचएफडब्ल्यू’ची भूमिका अधोरेखित केली. "आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आम्ही डिजिटल आरोग्य पायाभूत सुविधांचा विस्तार करत आहोत. सोबतच, आरोग्य आणि कल्याण केंद्रांद्वारे प्राथमिक आरोग्य सेवा मजबूत करत आहोत, तसेच लसीकरण मोहीमेचा विस्तार करत आहोत, नवीन लसींचा समावेश करत आहोत आणि रोग निरीक्षण प्रणाली अधिक प्रभावी बनवत आहोत," असे जाधव यांनी सांगितले.

या संस्थेने भारताच्या आरोग्य कर्मचाऱ्यांची क्षमता बळकट करण्यात आणि राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे आरोग्य सेवा महासंचालक डॉ. सुनीता शर्मा यांनी सांगितले.
या कार्यक्रमादरम्यान, संस्थेचे वार्षिक प्रकाशन, "धारणा", एचपीपीआय जर्नल आणि "प्रॉस्पेक्ट्स ऑफ प्लेसमेंट सेल" यांचे मान्यवरांच्या हस्ते औपचारिक प्रकाशन करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कर्मचारी, विद्यार्थी आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना त्यांच्या समर्पण आणि उत्कृष्टतेबद्दल पुरस्कार देखील प्रदान करण्यात आले.
या उत्सवात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक सादरीकरण देखील केले. हे सादरीकरण संस्थेच्या चैतन्यशील शैक्षणिक वातावरणाचे प्रतिबिंबित होते.

या वार्षिक दिन सोहळ्याने एनआयएचएफडब्ल्यू या संस्थेच्या समर्पण भावनेने देशभरातील आरोग्यसेवा वितरण आणि लोकांचे आरोग्य सुधारण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य शिक्षण, संशोधन आणि धोरणात्मक सहाय्य वाढवण्याच्या वचनबद्धतेची पुष्टी केली.
निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2237256)
अभ्यागत कक्ष : 8