संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्रालयाने सुरक्षा सूचना नियमावली 2026 केली जारी
Posted On:
09 MAR 2026 4:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मार्च 2026
संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी 9 मार्च 2026 रोजी नवी दिल्लीतील साउथ ब्लॉक येथे झालेल्या एका कार्यक्रमात संरक्षण मंत्रालयाच्या सुरक्षा सूचनांची नवीन नियमावली 2026 प्रकाशित केली. ही नियमावली म्हणजे सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे वर्णन करणारा एक व्यापक दस्तऐवज आहे, जो बदलती सुरक्षा परिस्थिती लक्षात घेऊन वेळोवेळी अद्यतनित केला जाईल.
संरक्षण सचिवांनी आपल्या भाषणात उदयोन्मुख धोके आणि वाढत्या सुरक्षा आव्हानांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा शिस्तीचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज यावर भर दिला. सर्व अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विहित सुरक्षा प्रक्रियांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे यावर त्यांनी भर दिला.
राजेश कुमार सिंह यांनी ही तपशीलवार सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी मंत्रालयाच्या सुरक्षा कार्यालयाच्या प्रयत्नांचे कौतुक केले. नवीन नियमावली मंत्रालयात सुरक्षित वातावरण राखण्यास मदत करेल, असे सांगत त्यांनी सुरक्षा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे आवाहन केले.

निलीमा चितळे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2237129)
अभ्यागत कक्ष : 12