कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
युवक, महिला आणि ग्रामीण उद्योजकांना विशेष पाठबळ
प्रविष्टि तिथि:
09 MAR 2026 6:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मार्च 2026
देशभरातील व्यावसायिक शिक्षणाची गुणवत्ता वाढवून त्याची एकंदर सुसंगतता वाढवण्याच्या उद्देशाने केंद्रीय मंत्रिमंडळाने अद्यतन आय टी आय च्या माध्यमातून प्रधान मंत्री कौशल्य आणि रोजगारक्षम परिवर्तन (पीएम सेतू) योजनेला मंजुरी दिली आहे.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये:
i. औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षण गुणवत्तेत सुधारणा करणे
ii. उद्योग मानकांनुसार पायाभूत सुविधा आणि उपकरणे यांचे आधुनिकीकरण करणे;
iii. विशेषतः नवीन आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये;उद्योग-संलग्न दीर्घकालीन आणि अल्पकालीन अभ्यासक्रम सुरू करणे,
iv. मागणी-केंद्रित कौशल्य आणि चांगल्या रोजगार परिणामांसाठी उद्योग संबंध मजबूत करणे; आणि
v. प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थांची क्षमता वाढवणे.
पीएम सेतू योजना उद्योग चलित प्रशासनाच्या माध्यमातून रोजगारक्षमता सुधारण्यावर लक्ष केंद्रित करते आणि अप्रत्यक्षपणे स्वयंरोजगारला तसेच उद्योजकतेला पाठिंबा देते. त्यादृष्टीने प्रशिक्षणार्थीना उद्योगाशी निगडित कौशल्य संपादन करणे, प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणचा अनुभव घेणे आणि करिअर विषयक मार्गदर्शन, रोजगारासाठी प्लेसमेंट सहाय्य, संस्थात्मक प्रणाली आणि उद्योगजगत यांच्यातील दुवा यामाध्यमातून स्वयंरोजगाराला पाठिंबा देणे इत्यादींचा समावेश होतो. मात्र, सर्व आयटीआय प्रशिक्षणार्थींसाठी अभ्यासक्रमात 120 तासांचे रोजगारक्षमता कौशल्य प्रशिक्षण (एक वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठी) समाविष्ट करण्यात आले आहे, ज्यामध्ये उद्योजकता, आर्थिक साक्षरता आणि डिजिटल साक्षरता यावरील मॉड्यूल समाविष्ट आहेत, ज्यामुळे ग्रामीण महिलांसह प्रशिक्षणार्थींना स्वयंरोजगाराच्या संधी शोधण्यास मदत होते.
या योजनेच्या अंमलबजावणीवर राष्ट्रीय सुकाणू समिती लक्ष ठेवणार असून यामध्ये केंद्र सरकारी आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी तसेच उद्योगातील भागीदारांचा समावेश असेल, ज्यामुळे संपूर्ण योजनेला मार्गदर्शनाचा लाभ होईल. याव्यतिरिक्त, संबंधित राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्य सुकाणू समित्या राज्य पातळीवर प्रगतीचे निरीक्षण करतील. या योजनेअंतर्गत नियमित देखरेख, कामगिरीचा आढावा आणि तृतीय पक्षाकडून प्रभाव मूल्यांकन केले जाईल ज्यामुळे प्रभावी अंमलबजावणी आणि अपेक्षित परिणाम यांची सुनिश्चिती केली जाईल.
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जयंत चौधरी यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2237114)
आगंतुक पटल : 55