गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

शिष्टाचाराचा भंग करत राष्ट्रपतींचा अवमान करुन पश्चिम बंगालमधील टीएमसी सरकारने अनाचाराची आणखी खालची पातळी गाठली आहे- केंद्रिय गृह व सहकार मंत्री

Posted On: 07 MAR 2026 9:39PM by PIB Mumbai



शिष्टाचाराचा भंग करत भारताच्या राष्ट्रपतींचा अवमान करुन पश्चिम बंगालमधील टीएमसी सरकारने अनाचाराची आणखी खालची पातळी गाठली, असे केंद्रिय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी  म्हटले आहे.

एक्स माध्यमावरील संदेशात केंद्रिय गृह मंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे की पश्चिम बंगालमधील टीएमसी सरकारने शिष्टाचाराचा भंग करत राष्ट्रपतींचा अवमान करुन अनाचाराची आणखी खालची पातळी गाठली. टीएमसी सरकार केवळ नागरिकांच्याच घटनात्मक अधिकारांची पायमल्ली करत नाही; तर देशाच्या राष्ट्रपतींनाही जुमानत नाही हे या घटनेतून उघडपणे दिसून आले. भारतातील सर्वोच्च घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीचा अनादर; त्यातही आदिवासी बंधुभगिनींनी आयोजित केलेल्या कार्यक्रमातील अनादर हा आपल्या देशाचा आणि आपल्या घटनात्मक लोकशाही मूल्यांचा अवमान आहे. लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आज अत्यंत दुःख झाले असून त्यांचा संताप होत आहे.    

***

सुषमा काणे/सुरेखा जोशी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2236513) अभ्यागत कक्ष : 20