युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडविया आणि रक्षा खडसे यांनी बेंगळुरूमधील माय भारत-एनएसएस चिंतन शिबिराच्या पहिल्या दिवसाचे भूषविले अध्यक्षस्थान
Posted On:
06 MAR 2026 10:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 मार्च 2026
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या युवा व्यवहार विभागाने बेंगळुरू येथील स्टेम सेल सायन्स अँड रिजनरेटिव्ह मेडिसिन (इनस्टेम) या संस्थेत आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या माय भारत-एनएसएस चिंतन शिबिराचा पहिला दिवस यशस्वीरित्या साजरा केला.या चिंतन शिबिराचे उद्दिष्ट सहकार्य मजबूत करणे,सर्वोत्तम पद्धती सामायिक करणे आणि स्वतंत्र भारतातील अमृत पिढीला राष्ट्र उभारणीत सक्रिय भागीदार म्हणून सक्षम करण्यासाठी आणि विकसित भारत@2047 च्या दृष्टिकोनाला पुढे नेण्यासाठी एक धोरणात्मक आराखडा विकसित करणे हा आहे.
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय आणि युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते या चिंतन शिबिराचे उद्घाटन झाले.महाराष्ट्रासह 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांनी यावेळी झालेल्या चर्चेत भाग घेतला.

भारतातील तरुणांनी केवळ विकासात सहभागी होऊ नये तर देशाच्या भविष्याचे शिल्पकार बनले पाहिजे,असे यावेळी झालेल्या उदघाटनपर भाषणात डॉ. मनसुख मांडवीय यांनी अधोरेखित केले.प्रत्येक तरुण नागरिकाने स्वतःला विकसित भारताचा दृष्टिकोन विकसित करण्यासाठी सक्षम केले पाहिजे,असे आवाहनही मांडवीय यांनी यावेळी केले..त्यासाठी युवा विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांमध्ये सामुहिक बांधिलकी,समन्वय, समन्वय, नेटवर्किंग आणि अनुभवांचे सतत आदानप्रदान आवश्यक आहे,असे त्यांनी पुढे नमूद केले.

देशभरातील युवकांचा सहभाग अधिक मजबूत करण्यासाठी मंत्रीमहोदयांनी अनेक उपाययोजना सुचवल्या.त्यांनी जिल्हा आणि तालुका पातळीवर युवा क्लब, एनएसएस स्वयंसेवक आणि डिजिटल प्रचार गटांसह संरचित युवा नेटवर्क तयार करण्याची गरज अधोरेखित केली, तसेच माय भारत मंचाद्वारे सामाजिक माध्यमांसोबत समन्वय मजबूत करण्याची आवश्यकता व्यक्त केली.

चिंतन शिबिराचा मार्गदर्शक दृष्टिकोन विशद करताना, रक्षा खडसे यांनी राष्ट्र उभारणीतील युवकांचा सहभाग आणि स्वयंसेवेची परिवर्तनकारी भूमिका अधोरेखित केली आणि युवा क्लब, एनएसएस युनिट्स आणि माय भारत उपक्रमांद्वारे तळागाळातील युवकांचा सहभाग अधिक मजबूत करण्याची गरज यावर भर दिला, ज्यामुळे तरुणांचा सामुदायिक विकास होईल आणि राष्ट्रीय प्रगतीमध्ये अर्थपूर्ण योगदान देता येईल.
या दृष्टिकोनांवर आधारित "संवाद से समाधान" या संकल्पनेअंतर्गत झालेल्या परस्पर शिक्षण, धोरण संरेखन आणि सहभागी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अनुभव सामायिकरण यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.

देशभरातील युवा विकासात सहभागी असलेल्या भागधारकांमध्ये संवाद, सहकार्य आणि धोरणात्मक संरेखनासाठी माय भारत-एनएसएस चिंतन शिबिर एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून काम करते. ही चर्चासत्रे युवा सहभाग यंत्रणांना अधिक बळकटी देतील आणि विकसित भारत@2047 च्या दृष्टिकोनाला साकार करण्यात स्वतंत्र भारताच्या अमृत पिढीच्या सक्रिय सहभागाला चालना देतील.
सोनाली काकडे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2236221)
अभ्यागत कक्ष : 13