दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून (TRAI) मुंबईतील नेटवर्क गुणवत्तेचे मूल्यमापन
Posted On:
06 MAR 2026 8:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 मार्च 2026
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) जानेवारी 2026 मध्ये मुंबई, मुंबई परवानाकृत सेवा क्षेत्रातील विस्तृत शहर, रेल्वे आणि किनारी मार्गांचा समावेश असलेल्या आपल्या स्वतंत्र चाचणीचे निष्कर्ष प्रसिद्ध केले. ट्रायच्या बेंगळुरू येथील प्रादेशिक कार्यालयाच्या देखरेखीखाली घेण्यात आलेल्या या चाचण्या, शहरी भाग, संस्थात्मक हॉटस्पॉट्स, सार्वजनिक वाहतूक केंद्रे आणि हाय-स्पीड कॉरिडॉर्स अशा विविध वातावरणात मोबाईल नेटवर्कच्या प्रत्यक्ष कामगिरीची नोंद घेण्यासाठी तयार करण्यात आल्या होत्या
20 जानेवारी 2026 ते 23 जानेवारी 2026 दरम्यान, 'ट्राय'च्या पथकांनी मुंबईतील 214.8 किमी. क्षेत्रात सविस्तर चाचणी केली. यामध्ये 201.7 किमीची सिटी ड्राईव्ह, 7 हॉट स्पॉट्स, 3.7 किमी वॉक टेस्ट आणि 9.4 किमी. च्या किनारी मार्गाचा समावेश होता.
यामध्ये 2G, 3G, 4G, आणि 5G यांसारख्या तंत्रज्ञानाचे मूल्यमापन करण्यात आले, जे विविध हँडसेट क्षमता असलेल्या वापरकर्त्यांच्या सेवा अनुभवांना प्रतिबिंबित करते. या स्वतंत्र चाचण्यांचे निष्कर्ष पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी संबंधित सर्व दूरसंचार सेवा प्रदात्यांना कळवण्यात आले आहेत
मूल्यमापन केलेले मुख्य निकष:
अ) व्हॉइस सेवा: कॉल सेटअप सक्सेस रेट, कॉल ड्रॉप रेट, कॉल सेटअप वेळ, कॉल सायलेन्स रेट, स्पीच क्वालिटी आणि कव्हरेज.
ब) डेटा सेवा : डाऊनलोड/अपलोड थ्रूपुट, लॅटन्सी, जिटर, पॅकेट ड्रॉप रेट आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग विलंब
मुख्य QoS (सेवा गुणवत्ता) निकषांच्या कामगिरीचा सारांश:
कॉल सेटअप सक्सेस रेट (टक्क्यांमध्ये)
कॉल सेटअप वेळ (सेकंदात)
ड्रॉप कॉल रेट (टक्क्यांमध्ये)
मीन ओपिनियन स्कोर (व्हॉइस क्वालिटीचे प्रतिनिधित्व करणारा स्कोअर)
मुंबईतील या मूल्यमापनामध्ये रेतीबंदर, मुंब्रा, दहीसर मोरी, नावदे, तळोजा, देवीचापाडा, उस्ताणे, तळोजा बायपास फाटा, भावदेवी नगर, शिळ फाटा खाडी, महापे, कोपरखैरणे, वाशी प्लाझा, तुर्भे एमआयडीसी, एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, घणसोली, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, रबाळे, ऐरोली, दिघा गाव, कळवा (पश्चिम) आणि वास्तू आनंद इत्यादी दाट लोकवस्तीच्या भागांचा समावेश होता.
ट्राय'ने ऐरोली पोलीस स्टेशन, कळवा तहसीलदार कार्यालय, मिलेनियम बिझनेस पार्क , मुंब्रा महानगरपालिका रुग्णालय, एनएमएमसी विभाग कार्यालय कोपरखैरणे, पावणे एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया आणि रबाळे एमआयडीसी टीटीसी इंडस्ट्रियल एरिया (मुख्य गेट) येथील प्रत्यक्ष परिस्थितीचे देखील मूल्यमापन केले.


तपशीलवार अहवाल ट्रायच्या www.trai.gov.in. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी ट्रायच्या ब्रजेंद्र कुमार, सल्लागार (प्रादेशिक कार्यालय, बेंगळूरू) यांच्याशी adv.bengaluru@trai.gov.in या ई मेलवर किंवा +91-80-22865004 या दूरध्वनीवर संपर्क साधता येईल.
निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2236179)
अभ्यागत कक्ष : 19