औषधनिर्मिती विभाग
azadi ka amrit mahotsav

जनऔषधी सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी देशभरात विविध ठिकाणी मोठ्या जनसहभागातून जागरूकता मोहीमांचे यशस्वी आयोजन

Posted On: 02 MAR 2026 9:10PM by PIB Mumbai
 

नवी दिल्ली, 2 मार्च 2026

कर्नाटकातील उडुपी येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबिर 
 
आठवडाभर चालणाऱ्या ‘जनऔषधी सप्ताह 2026’ उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी आज देशभरात उत्साही जनप्रतिसाद मिळाला. या निमित्ताने परवडणाऱ्या आणि गुणवत्तापूर्ण जेनेरिक औषधांबाबत अधिक जनजागृती  करण्यात आली. उद्घाटन दिवसापासून मिळालेल्या उत्साही प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर देशभरात साठहून अधिक आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. दिनांक 7 मार्च 2026 रोजी साजऱ्या होणाऱ्या 8 व्या जनऔषधी दिवसांपूर्वी ही उपक्रम मालिका राबवण्यात येत आहे. 
 
अनेक ठिकाणी लाभार्थ्यांना मोफत जेनेरिक औषधे वितरित करण्यात आली. या उपक्रमाला एकूणच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. सहभागी नागरिकांनी उपलब्ध सेवांबाबत समाधान व्यक्त केले.  
बिहार सरकारच्या मंत्री रमा निषाद यांची मुजफ्फरपुरमधील औरई येथील आरोग्य तपासणी शिबिराला भेट 
झारखंडमधील जमशेदपूर येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबिर 
रसायने आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत भारतीय औषध आणि वैद्यकीय उपकरण ब्युरो (पीएमबीआय) 1 ते 5 मार्च 2026 दरम्यान 250 हून अधिक ठिकाणी या देशव्यापी उपक्रमाचे नेतृत्व करत आहे. “जन औषधी सस्ती भी, भरोसेमंद भी - सहत की बात, बचत के साथ” या संकल्पनेअंतर्गत जनऔषधी केंद्रामार्फत नागरिकांच्या घराजवळ मूलभूत निदान सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आज दुसऱ्या दिवशी शिबिरांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. शाळकरी मुलांनी देखील विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून सामुदायिक सहभाग अधिक बळकट केला.  
 
सामान्य आरोग्य तपासणीसोबतच काही ठिकाणी थायरॉईड चाचणी, बालरोग सेवा आणि दीर्घकालीन आजारांसाठी सल्लामसलत यासारख्या इतर निदान सेवा देखील  प्रदान करण्यात आल्या. याशिवाय, मासिक पाळीच्या किफायतशीर स्वच्छता उत्पादनांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महिलांना जनऔषधी सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे (पीएमबीजेके) द्वारे परवडणाऱ्या किमतीत गुणवत्तापूर्ण जेनेरिक औषधे उपलब्ध आहेत याबद्दल नागरिकांना माहिती देण्यासाठी जागरूकता सत्रे देखील आयोजित करण्यात आली.
 
 
 
महाराष्ट्रातील पालघर येथे सुरू असलेल्या आरोग्य तपासणी शिबिराला नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक यांची भेट 
 

सोनाली काकडे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2234775) अभ्यागत कक्ष : 8