संरक्षण मंत्रालय
नौदल आयुध विभागाचे महासंचालक म्हणून बी. पी. सिंह यांनी स्वीकारला पदभार
Posted On:
02 MAR 2026 8:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मार्च 2026
नौदल शस्त्रास्त्र विभागाचे महासंचालक (डीजीओएनए) म्हणून बी. पी. सिंह यांनी 1 मार्च 2026 रोजी नवी दिल्लीतील नौदलाच्या मुख्यालयात पदभार स्वीकारला. भारतीय नौदल शस्त्रास्त्र सेवा (आयएनएएस) विभागाच्या 1994 च्या तुकडीतील अधिकारी असलेले बी. पी. सिंह , दिवाकर जयंत यांच्या जागी महासंचालक पदाचा कार्यभार पाहतील. दिवाकर जयंत देशासाठी उत्कृष्ट सेवा बजावल्यानंतर 28 फेब्रुवारी 2026 रोजी निवृत्त झाले.
बी. पी. सिंह यांनी पाटणा येथील बिहार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून (आताचे नॅशनल इनस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेची पदवी मिळवली आहे. त्यांच्याकडे नौदल शस्त्रास्त्र संस्थेतील तीस वर्षांपेक्षा जास्त सेवेचा समृद्ध व वैविध्यपूर्ण अनुभव आहे. डीजीओएनए म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी ते मुंबईतील नौदल आयुध भांडाराचे(एनएडी) मुख्य महाव्यवस्थापक म्हणून काम करत होते. या सेवेत त्यांनी महत्त्वाच्या कार्यकारी, लॉजिस्टीक आणि पायाभूत सुविधा उपक्रमांचे नेतृत्व केले.
बी. पी. सिंह यांनी एनएडी विशाखापट्टणम, एनएडी मुंबई आणि एनएडी ट्रॉम्बे यासारख्या प्रमुख ठिकाणी विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. नवी दिल्लीतील नौदल मुख्यालयात नौदल शस्त्रास्त्र महासंचालनालयात त्यांनी शस्त्रास्त्र विभागात धोरण निर्मिती व धोरणात्मक नियोजन क्षेत्रात काम केले आहे. याशिवाय एनएडी अलुवा इथे मुख्य महाव्यवस्थापक म्हणून काम करताना त्यांनी कामकाजातील कार्यक्षमता व भांडार व्यवस्थापन पद्धती आणखी मजबूत केली.
बी पी. सिंह यांना पारंपरिक शस्त्रास्त्रे व दारुगोळा यांच्या व्यवस्थापनातील तसेच भारतीय नौदलातील मार्गदर्शित शस्त्रास्त्र प्रणालीचा दांडगा अनुभव आहे. खरेदी, साठवणूक, देखभाल, सुरक्षा, लॉजिस्टीक्स व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रात ते कुशल आहेत.
प्रतिष्ठीत नॅशनल डिफेन्स कॉलेजचे (एनडीसी-60) माजी विद्यार्थी असलेल बी पी. सिंह यांनी धोरणात्मक राष्ट्रीय सुरक्षा अभ्यासक्रमाचे आधुनिक प्रशिक्षण घेतले आहे, त्यामुळे त्यांच्या नेतृत्व क्षमतेत आणखी वाढ झाली.
W0PP.jpg)
LB55.jpg)
सोनाली काकडे/सुरेखा जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2234757)
अभ्यागत कक्ष : 9