ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav AI Impact Summit 2026

केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल यांनी एआय इम्पॅक्ट शिखर परिषद 2026 मध्ये ऊर्जा मंत्रालयाच्या पॅव्हेलियनचे केले उद्घाटन

Posted On: 18 FEB 2026 10:26PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 फेब्रुवारी 2026

 

केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल यांनी आज भारत मंडपम येथे आयोजित एआय इम्पॅक्ट शिखर परिषद 2026 मध्ये ऊर्जा मंत्रालयाच्या पॅव्हेलियनचे उद्घाटन केले. हे दालन भारताच्या भविष्यासाठी सज्ज, कार्यक्षम आणि सक्षम ऊर्जा क्षेत्र तयार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकते.

"मेगावॅट्सपासून मेगाबाइट्सपर्यंत: भारताच्या ऊर्जा परिसंस्थेचा कायापालट" या संकल्पनेवर आधारित या पॅवेलियनमध्ये ऊर्जा क्षेत्राची भविष्यदृष्टी सादर करण्यात आली आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे निर्मिती, वहन आणि वितरण प्रणाली अशा बदलत आहेत, हे या दालनात अधोरेखित करण्यात आले आहे.

   

ऊर्जा मंत्रालयाच्या पॅव्हेलियनमध्ये प्रदर्शित केलेल्या काही प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये यांचा समावेश आहे:

  1. आत्मनिर्भर भारतासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऊर्जा: प्रगत डिजिटल उपाययोजनांमुळे ऊर्जा मूल्य साखळीत अधिक स्मार्ट कार्यपद्धती आणि प्रभावी निर्णय प्रक्रिया कशी सक्षम होते याचे प्रात्यक्षिक.
  2. स्टार्टअप झोन: ऊर्जा परिसंस्थेच्या परिवर्तनाला चालना देणारे स्टार्टअप-आधारित नवोन्मेषी उपाय प्रदर्शित करणारे एक समर्पित व्यासपीठ.
  3. पीजी-अमृत — ट्रान्समिशनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे पॉवरग्रिड मालमत्ता व्यवस्थापन: ट्रान्समिशन मालमत्ता देखरेख आणि ऑपरेशनल कार्यक्षमता वाढविण्यासाठी पॉवरग्रिडचा एक कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम उपक्रम.
  4. ई-आभास अर्ली वॉर्निंग सिस्टम: धरणे आणि बंधाऱ्यांसाठी एआय/एमएल आणि आयओटी-आधारित रिअल-टाइम मॉनिटरिंग आणि पूरपूर्व अंदाज प्रणाली, जी सक्रिय जोखीम व्यवस्थापन आणि सुधारित सुरक्षितता सक्षम करतो.
  5. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित आरडीएसएस अंमलबजावणी: भारतीय वीज वितरण कंपनीच्या (डिस्कॉम्स) कार्यक्षमतेशी आणि महसूल व्यवस्थापनाशी संबंधित आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रगत, नवोन्मेषी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर.

या पॅव्हेलियनमधून पायाभूत सुविधांची विश्वासार्हता मजबूत करण्यासाठी, कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि उर्जा क्षेत्रातील शाश्वत वाढीला पाठिंबा देण्यासाठी अत्याधुनिक एआय तंत्रज्ञान समाविष्ट करण्यावर मंत्रालयाचा भर स्पष्टपणे दिसून येतो. 

एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेत दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (डीएमआरसी) प्रदर्शनालाही मंत्र्यांनी भेट दिली. डीएमआरसीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विकास कुमार यांनी त्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात डीएमआरसीने घेतलेल्या पुढाकारांची माहिती दिली.

डीएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे ग्राहकांच्या तक्रारी आणि प्रवाशांशी संबंधित समस्यांचे जलद निवारण होण्यास मदत होईल. देखभाल क्षेत्राच्या बाबतीत, एआयचा वापर ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशन (ओएचई), पॅन्टोग्राफ-ओएचई परस्परसंवाद, व्हील ग्राइंडिंग, रोलिंग स्टॉक सबसिस्टम आणि सिग्नलिंगचे निरीक्षण करण्यासाठी केला जात आहे.

 

* * *

शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2230030) अभ्यागत कक्ष : 12