विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
कृत्रिम बुद्धिमत्ता हा आता एक पर्याय राहिला नसून जीवनाच्या प्रत्येक पैलूतील कार्याचा एक अनिवार्य घटक बनला आहे : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह
Posted On:
17 FEB 2026 9:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2026
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे "भारतजन मॉडेल्स: व्हिजन अँड टेक्निकल एक्झिक्युशन 2026" या विषयावरील सत्राला संबोधित केले. यावेळी भारताच्या पहिल्या सरकारी मालकीच्या सार्वभौम मल्टीमोडल लार्ज लँग्वेज मॉडेल, बहुभाषिक एआय स्टॅकचे कौतुक करताना ते म्हणाले की कृत्रिम बुद्धिमत्ता आता जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात काम करण्याचा एक पर्याय नसून एक आवश्यक घटक आहे.
जागतिक एआय शिखर परिषदेचा भाग म्हणून, भारतजेनने इंडिया एआय मिशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे सत्र आयोजित केले होते.
भारतजेन टीमचे अभिनंदन करुन सिंह म्हणाले की हा उपक्रम म्हणजे तांत्रिक आत्मनिर्भरतेच्या भारताच्या प्रवासातील एक उल्लेखनीय टप्पा आहे. भारतजेन हे भारताच्या सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ आणि भाषिक विविधतेनुसार तयार केलेले सरकारी मालकीचे सार्वभौम बहुभाषिक आणि बहुआयामी लार्ज लँग्वेज मॉडेल उपक्रम म्हणून वैशिष्ट्यपूर्ण ठरते. लार्ज लँग्वेज मॉडेल्स जागतिक स्तरावर ओळखले जात असते तरी भारतजेनचे वेगळे वैशिष्ट्य असे आहे की ते सार्वभौम आणि सरकारच्या पाठबळासह विकसित केलेले असून तंत्रज्ञानाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच सरकारने पुढाकार घेऊन सक्रिय धोरणात्मक भूमिका घेतली आहे, हे यातून स्पष्ट होते.
भारतजेन मधून "संपूर्ण विज्ञान, संपूर्ण सरकार आणि संपूर्ण राष्ट्र" मॉडेलचे उदाहरण दिसून येते असे ते म्हणाले.
या प्रकल्पाची तांत्रिक खोली अधोरेखित करत त्यांनी सांगितले की भारतजेन मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अनेक प्रकारांचा समावेश आहे. यामध्ये मजकूरावर आधारित लार्ज लँग्वेज मॉडेल्स, मजकूराचे आवाजात रूपांतर आणि आवाजाचे मजकूरात रूपांतर करणारे भाषणविषयक तंत्रज्ञान, दस्तऐवज समजून घेणारी व्हिजन-लँग्वेज मॉडेल्स यांचा समावेश आहे.
अलीकडच्या काळात झालेल्या प्रगतीवर प्रकाश टाकताना डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले की भारतजेनने आधीच आयुर्वेदासाठी आयुर परम, शेतीसाठी कृषी परम आणि भारतीय कायदेशीर क्षेत्रासाठी कायदेशीर परम असे क्षेत्रविशिष्ट फाइन-ट्यून केलेले मॉडेल जारी केले आहेत.
भारताची भाषिक विविधता 22 सूचिबद्ध भाषांच्या पलीकडे असून मोठ्या प्रमाणावर बोलल्या जाणाऱ्या प्रादेशिक भाषा आणि आणि बोलीभाषा समाविष्ट करण्यासाठी डेटासेटचा सतत विस्तार करण्याची गरज आहे, यावर त्यांनी भर दिला.
सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्राच्या मानसिकतेत बदल करण्याच्या गरजेचे आवाहन करत जितेंद्र सिंह यांनी सांगितले की कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानासाठी एकल नव्हे तर सहयोगात्मक दृष्टीकोनाची गरज आहे. सरकार समर्थक धोरणे, सुरुवातीच्या टप्प्यातील निधी आणि खाजगी सहभागासाठी खुली भूमिका यांद्वारे नवोन्मेष सक्षम करण्यास कटिबद्ध आहे, ज्यामुळे भारत जागतिक प्रगतीच्या गतीशी जुळवून घेऊन शकेल.
यावेळी सिंह यांच्या उपस्थितीत भारतजेन आणि आयआयटी मुंबई हेरिटेज फाउंडेशन यांच्यात सामंजस्य कराराची देवाणघेवाणही झाली.




शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2229384)
अभ्यागत कक्ष : 7