पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक हितासाठी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गुणांवर प्रकाश टाकत संस्कृत सुभाषित केले सामायिक
प्रविष्टि तिथि:
17 FEB 2026 10:53AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाला समाजासाठी खऱ्या अर्थाने उपयुक्त बनवण्यासाठी बुद्धिमत्ता, तर्कशक्ती आणि निर्णयक्षमतेचे महत्त्व अधोरेखित केले. इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेच्या अनुषंगाने त्यांनी शिखर परिषदेचा मुख्य उद्देश सर्व नागरिकांच्या कल्याणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा कसा वापर करता येईल याचा शोध घेणे, असल्याचे सांगितले.
पंतप्रधानांनी एक्स वर प्राचीन ज्ञानाचा संदर्भ देत बुद्धिमत्तेच्या कालातीत गुणांवर भाष्य करत एक संस्कृत सुभाषित उद्धृत केले:
“बुद्धिमत्ता, तर्कशक्ती आणि निर्णयक्षमता या विज्ञान आणि तंत्रज्ञानाला सर्वसामान्यांसाठी उपयुक्त बनवतात. इंडिया एआय इम्पॅक्ट समिट चा उद्देशही हाच आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सर्वांच्या हितासाठी कसा करता येईल.
शुश्रूषा श्रवणं चैव ग्रहणं धारणां तथा।
ऊहापोहोऽर्थविज्ञानं तत्त्वज्ञानं च धीगुणाः॥”
नितीन फुल्लुके /श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2228982)
आगंतुक पटल : 59
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam