इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
इंडीया एआय इंपॅक्ट समिट 2026 अंतर्गत तीन प्रमुख जागतिक एआय प्रभाव स्पर्धांसाठी अंतिम फेरीतील संघांची घोषणा
60 पेक्षा अधिक देशांमधून 4,650 पेक्षा अधिक अर्ज; विस्तारक्षम एआय उपाय सादर करण्यासाठी अव्वल 70 संघांची निवड
Posted On:
15 FEB 2026 12:10PM by PIB Mumbai
16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्ली येथे होणाऱ्या इंडीया एआय इंपॅक्ट समिट 2026 पूर्वी तीन प्रमुख जागतिक प्रभाव स्पर्धा, एआय फाॅर आॅल, एआय बाय हर आणि वाययूव्हीएआय -युवाई यांच्या अंतिम फेरीतील संघांची घोषणा करण्यात आली आहे.
जागतिक प्राधान्यांशी सुसंगत, नाविन्यपूर्ण आणि प्रभावी एआय उपायांच्या प्रसारासाठी या स्पर्धा सुरू करण्यात आल्या आहेत. एकूण 60 पेक्षा अधिक देशांमधून 4,650 हून अधिक अर्ज प्राप्त झाले असून यामुळे मजबूत आंतरराष्ट्रीय सहभाग अधोरेखित झाला आहे.
विषयतज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील नेत्यांनी केलेल्या बहुपदरी आणि कठोर मूल्यमापनानंतर सर्व स्पर्धांमधून अव्वल 70 संघांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. हे संघ 16 आणि 17 फेब्रुवारी रोजी भारत मंडपम आणि सुषमा स्वराज भवन येथे होणाऱ्या शिखर परिषदेच्या `ग्रँड फिनाले` आणि पुरस्कार समारंभात आपले उपाय सादर करतील.
एआय फाॅर आॅल
एआय फाॅर आॅल ग्लोबल चॅलेंज अंतर्गत अंतर्गत 60 पेक्षा अधिक देशांमधून 1,350 हून अधिक अर्ज प्राप्त झाले. आरोग्य, शेती, हवामान लवचिकता, प्रशासन, शिक्षण आणि आर्थिक समावेशन या क्षेत्रांतील विस्तारक्षम एआय उपायांवर या स्पर्धेचा भर होता. अव्वल 20 अंतिम फेरीतील संघांनी उच्च प्रभावी आणि प्रत्यक्ष वापरातील उपाय सादर केले आहेत. यामध्ये एआय-आधारित संसर्ग तपासणी, मृदा बुद्धिमत्ता प्रणाली, हवामान जोखीम विश्लेषण, डिजिटल आरोग्य निदान, सायबर सुरक्षा, औद्योगिक कार्यक्षमता, सुलभ शिक्षण तंत्रज्ञान आणि एआय-सक्षम प्रशासन प्रणाली यांचा समावेश आहे. या नवकल्पना दर्शवितात की एआयच्या माध्यमातून समतोल विकास साधता येतो आणि जागतिक दक्षिणेमधील सार्वजनिक सेवा वितरण अधिक सक्षम करता येते.
एआय बाय हर
एआय बाय हर ग्लोबल इंपॅक्ट चॅलेंज अंतर्गत 50 पेक्षा अधिक देशांमधून 800 हून अधिक अर्ज प्राप्त झाले. ही स्पर्धा कृत्रिम बुद्धिमत्तेतील महिला-नेतृत्वाखालील नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित आहे. अव्वल 30 अंतिम फेरीतील संघांमध्ये आरोग्य, शाश्वतता, आर्थिक समावेशन, कौशल्य विकास, शिक्षण, शेती आणि डिजिटल वाणिज्य या क्षेत्रांतील प्रभावी एआय उपाय विकसित करणाऱ्या महिला उद्योजकांचा समावेश आहे. त्यांच्या नवकल्पनांमध्ये एआय-सक्षम कर्करोग आणि रेटिना तपासणी साधने, बहुभाषिक नैदानिक निर्णय सहाय्य प्रणाली, व्हॉइस-टू-ईएमआर मंच, अचूक पोषण उपाय, पत बुद्धिमत्ता प्रणाली, ईएसजी स्वयंचलित मंच आणि बहुभाषिक स्थानिकीकरण तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. एआय बाय हर ही उपक्रम शासनाच्या सर्वसमावेशक डिजिटल विकासाच्या वचनबद्धतेचे प्रतीक असून जागतिक एआय परिसंस्थेत महिला नवोन्मेषकांना अग्रभागी स्थान देण्याचा प्रयत्न अधोरेखित करते.
वाययूव्हीएआय -युवाई ग्लोबल युथ चॅलेंज
युवाई ग्लोबल युथ चॅलेंज अंतर्गत 38 देशांमधून 2,500 हून अधिक अर्ज प्राप्त झाले. 13 ते 21 वयोगटातील युवा एआय नेत्यांच्या नवोपक्रम आणि समस्या सोडविण्याच्या क्षमतेचे हे व्यासपीठ आहे. अव्वल 20 अंतिम फेरीतील संघ सार्वजनिक आरोग्य, शेती, हवामान लवचिकता, सुलभता, स्मार्ट गतिशीलता आणि डिजिटल विश्वास या क्षेत्रांमध्ये एआयचा वापर करत आहेत. त्यांच्या उपायांमध्ये मलेरिया शोध प्रणाली, एआय-आधारित भाषण सहाय्यक परिधानयोग्य उपकरणे, गर्भाशयमुख कर्करोग तपासणी साधने, ग्रामीण आरोग्यसेवेसाठी दूरस्थ वैद्यकीय सेवा प्रणाली, कृषी बुद्धिमत्ता प्रणाली, पशुधन विश्लेषण, वनाग्नि आणि पूर पूर्वसूचना प्रणाली, कृत्रिम माध्यम फसवणूक शोध प्रणाली आणि दृष्टिहीनांसाठी सहाय्यक तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. युवाई हा उपक्रम जागतिक स्तरावर उदयास येणाऱ्या युवा प्रतिभेला प्रोत्साहन देणारा असून सामाजिक गरजा आणि विकासात्मक प्राधान्यांशी सुसंगत युवा-नेतृत्वाखालील नवोपक्रमांना चालना देण्यास वचनबद्ध आहे.
तीनही स्पर्धांमधील अव्वल 70 संघ इंडीया एआय इंपॅक्ट समिट 2026 मध्ये आपले उपाय सादर करणार असून धोरणकर्ते, उद्योग नेते, गुंतवणूकदार आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधतील. त्यांच्या नवकल्पनांचा राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर विस्तार होण्यासाठी त्यांना सन्मान आणि परिसंस्था सहाय्य प्रदान करण्यात येईल. या मजबूत जागतिक प्रतिसादामुळे जबाबदार एआय नवोपक्रमाचे केंद्रस्थान म्हणून भारताची वाढती भूमिका अधोरेखित होते, जी जनकल्याण, पर्यावरण आणि प्रगती या दृष्टिकोनावर आधारित आहे.
***
एआय फाॅर आॅल
एआय फाॅर आॅल अंतर्गत अव्वल 20 अंतिम फेरीतील संघ पुढीलप्रमाणे आहेत:
● एवन (भारत) – औद्योगिक कार्यक्षमता निरीक्षण आणि ऊर्जा अनुकूलनासाठी आयओटी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता मंच
● बायोम मेकर्स इन्क (बिक्रॉप) (यूएसए) – मृदा आरोग्यावरील पूर्वानुमानात्मक माहिती देणारा कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम मृदा बुद्धिमत्ता मंच
● कार्बजेम इन्क (बिट्टे) (जपान) – जलद संसर्ग तपासणीसाठी स्मार्टफोन-आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता साधन
● कोअर स्टॅक (भारत) – उपग्रह आणि क्षेत्रीय माहितीचे जमीन व जल व्यवस्थापन अंतर्दृष्टीत रूपांतर करणारा कृत्रिम बुद्धिमत्ता मंच
● क्रॉपस्कॅन स्मार्ट फार्मिंग आयओटी टेक्नॉलॉजी (केन्या) – हातात धरण्यायोग्य कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम पिक निदान आणि पोषकतत्त्व शोध उपकरण
● एलेमेंटेक सर्कल प्रा. लि. (भारत) – कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित मागणी अंदाज आणि स्वयंचलित मागणी प्रतिसाद प्रणाली
● इक्विट्विन बाय इन्फियस हेल्थ (कॅमेरुन) – कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम डिजिटल रुग्ण प्रतिरूप तंत्रज्ञान
● फोरस हेल्थ प्रा. लि. (इंडिया) – कमी खर्चातील कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम वैद्यकीय प्रतिमा वर्गीकरण साधन
● हेलिओस 2.0 (थिंकरबेल लॅब्स) (भारत) – सुलभ कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम शिक्षण मंच
● इन्फिहील हेल्थटेक (भारत) – जोखीम वर्गीकरणासह बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्ता मानसिक आरोग्य मंच
● इंटेलो लॅब्स प्रा. लि. (भारत) – डिजिटल बाजारपेठेसह एकत्रित कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित पिक श्रेणीकरण प्रणाली
● किडौरा इनोव्हेशन्स प्रा. लि. (भारत) – कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित ऑटिझम आणि विकास विलंब तपासणी साधन
● मधुनेत्रएआय (भारत) – मधुमेही रेटिनोपॅथी तपासणीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उपाय
● वन ग्लोबल मेडिकल टेक्नॉलॉजी (हेलियम हेल्थ) (नायजेरिया) – प्राथमिक आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता नैदानिक सहाय्यक
● पर्सेप्ट सीटीईएम (इंडिया) – कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित सायबरसुरक्षा दृश्यता मंच
● रिझिलियन्स360 (भारत) – कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित हवामान जोखीम आणि लवचिकता नियोजन साधन
● सॅटसोर्स (सॅटशुअर) (भारत) – उपग्रह आणि कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित शेत जोखीम गुणांकन मंच
● टॉर्चिट इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि. (भारत) – कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित सुलभ शिक्षण सामग्री मंच
● वज्र ग्लोबल कन्सल्टिंग सर्व्हिसेस एलएलपी (भारत) – संरचित प्रशासनिक माहितीसाठी सेमॅंटिक कृत्रिम बुद्धिमत्ता मंच
● वायसा (भारत) – कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम संवादात्मक मानसिक आरोग्य सहाय्य मंच
एआय बाय हर
एआय बाय हर अंतर्गत अव्वल 30 अंतिम फेरीतील संघ पुढीलप्रमाणे आहेत:
● झेको एआय – अचूक भरती प्रक्रियेसाठी उद्योग-स्तरीय कृत्रिम बुद्धिमत्ता प्रतिभा बुद्धिमत्ता मंच
● मॅजिकरोल एआय – मोठ्या प्रमाणावर वैयक्तिकृत चित्रफीत निर्मिती स्वयंचलित करणारा जनरेटिव्ह कृत्रिम बुद्धिमत्ता मंच
● ओपन लिंक्स फाउंडेशन (विनोबा) – कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान सुधारणा मंच
● सोडिएट – कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम अचूक पोषण आणि चयापचय आरोग्य मंच
● पेरिविंकल टेक्नॉलॉजीज प्रा. लि. (स्मार्ट स्कोप सीएक्स) – वहनयोग्य कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम गर्भाशयमुख कर्करोग तपासणी उपकरण
● शब्द एआय – 22 भारतीय भाषांमध्ये कार्य करणारा बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्ता स्थानिकीकरण मंच
● गुई एआय (अमेरिका) – सामाजिक परिणामासाठी लो-कोड बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्ता समन्वय मंच
● हॅपीकिड्स एआय (लुक्झेंबर्ग) – विद्यार्थ्यांच्या कल्याण आणि भावनिक साक्षरतेला प्रोत्साहन देणारा जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता मंच
● व्होलार आल्टा – कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम ड्रोन-आधारित औद्योगिक तपासणी बुद्धिमत्ता मंच
● एझो एआय – एमएसएमई डिजिटल ऑनबोर्डिंग सक्षम करणारा मोबाईल-प्रथम कृत्रिम बुद्धिमत्ता वाणिज्य मंच
● इंटेलिहेल्थ – आयु 2.0 – कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम बहुभाषिक नैदानिक निर्णय सहाय्य प्रणाली
● न्यूरा एआय – पुनर्वसनासाठी मार्करविरहित कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम हालचाल विश्लेषण मंच
● रेमिडिओ मेडिओशाय – स्मार्टफोन-आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता रेटिना तपासणी मंच
● लाइटबीज – एबलक्रेडिट – कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम पर्यायी पत बुद्धिमत्ता प्रणाली
● एनव्हाइब्स (केएनके स्क्वेअर) – एज-कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित दंत ध्वनी-नियंत्रण प्रणाली
● ईझीस्पीच (उझबेकीस्तान) – कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम भाषण उपचार आणि मार्गदर्शित गृह सराव मंच
● प्रोजेक्ट राइज (केन्या) – कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम बाल संरक्षण आणि आघात-जाणिवेवर आधारित सहाय्य प्रणाली
● फार्मरलाइफलाइन (केन्या ) – सौरऊर्जेवर चालणारी कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम शेतातील कीड आणि हवामान बुद्धिमत्ता प्रणाली
● सुपरह्युमन रेस फाउंडेशन– डिफाइन – मालमत्ता-स्तरीय उत्सर्जन बुद्धिमत्ता आणि हवामान माहिती मंच
● प्रोसिकल (व्हॉइस-एआय ओआरएफ मूल्यांकन) – बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्ता साक्षरता मूल्यांकन मंच
● वर्डवर्क्स एआय – स्वयंचलित बहु-चॅनेल कृत्रिम बुद्धिमत्ता संवादात्मक एजंट मंच
● इकोरेटिंग्स – सस्टेनिंग.एआय – कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित ईएसजी आणि कार्बन लेखांकन बुद्धिमत्ता मंच
● टॅलेंटी (पोलंड) – जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम करिअर गतिशीलता आणि मार्गदर्शन मंच
● टॉप पॅरेंट – प्रारंभिक बाल शिक्षण बळकट करणारा प्रादेशिक भाषेतील कृत्रिम बुद्धिमत्ता मंच
● मेव्हनएआय – बहुभाषिक कौशल्य-आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षण मंच
● वॅसर लॅब्स – फील्डवाइज – कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित कृषी बुद्धिमत्ता आणि धोरण अंतर्दृष्टी मंच
● अश्विन एआय – बहुभाषिक व्हॉइस-टू-ईएमआर आरोग्य दस्तऐवजीकरण प्रणाली
● सिव्ही एआय – बहुभाषिक ब्रँड सामग्रीसाठी जनरेटिव्ह कृत्रिम बुद्धिमत्ता डिझाइन मंच
● कॅंडिड एआय – कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम संवादात्मक विक्री आणि स्टोअरफ्रंट अनुकूलन एजंट
● डेटा पिजन (अमेरिका) – ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित पूर्वानुमान देखभाल मंच
युवाई ग्लोबल युथ चॅलेंज
युवाई ग्लोबल युथ चॅलेंज अंतर्गत अव्वल 20 अंतिम फेरीतील संघ पुढीलप्रमाणे आहेत:
● मलेरियाएक्स (थायलंड, 13–15 वर्षे) – ग्रामीण भागातील मलेरिया प्रजाती शोधासाठी बहु-मॉडेल कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली
● पॅरास्पीक (भारत, 16–18 वर्षे) – अस्पष्ट वाणी स्पष्ट वाणीमध्ये तत्काळ रूपांतर करणारे कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम परिधानयोग्य उपकरण
● आरोग्य एआय (भारत,19–21 वर्षे) – संदर्भाधारित वैद्यकीय तर्कास समर्थन देणारे नैदानिक भाषा मॉडेल
● साइटोस्कॅनझेड (थायलंड, 16–18 वर्षे) – कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम गर्भाशयमुख कर्करोग तपासणी आणि क्लाउड निदान मंच
● सेफपाथ एआय (भारत, 16–18 वर्षे) – कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित चौक सुरक्षितता सतर्कता प्रणाली
● अॅग्रीटेक प्रो (भारत,19–21 वर्षे) – कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित पिक निरीक्षण आणि उत्पादन अनुकूलन मंच
● केडोवोएआय (भारत, 13–15 वर्षे ) – कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम परस्परसंवादी एनसीईआरटी शिक्षण परिसंस्था
● मूअॅप्स (इंडोनेशिया, 19–21 वर्षे) – कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित शाश्वत पशुधन व्यवस्थापन प्रणाली
● वाइल्डट्रॅक 360 – मिशन त्रिशूल (भारत, 19–21 वर्षे ) – वन्यजीव आणि ग्रामीण सुरक्षिततेसाठी एकात्मिक कृत्रिम बुद्धिमत्ता मंच
● अग्निसेना (भारत, 19–21 वर्षे) – कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम वनाग्नि पूर्वसूचना प्रणाली
● वेव्ह ( भारत, 19–21 वर्षे ) – परस्परसंवादी ब्रेल शिक्षण सक्षम करणारा कृत्रिम बुद्धिमत्ता परिधानयोग्य हातमोजा
● सर्केडियन एआय (अमेरिया, 13–15 वर्षे) – स्मार्टफोन-आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता हृदय विकृती शोध साधन
● मेडिकेअर ( भारत, 19–21 वर्षे ) – ग्रामीण आरोग्यसेवेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित दूरवैद्यक मंच
● ट्रस्टट्रेस ( भारत, 19–21 वर्षे ) – मल्टिमीडिया कृत्रिम बुद्धिमत्ता डीपफेक शोध मंच
● रिअल-टाइम हवामान बुद्धिमत्ता आणि पूर पूर्वसूचना प्रणाली ( भारत, 19–21 वर्षे ) – पूर्वानुमानित पूर निरीक्षण प्रणाली
● थर्डआय ( भारत, 19–21 वर्षे ) – तत्काळ गतिशीलता मार्गदर्शनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता संवेदन प्रणाली
● डिसआर्थ्रिक वाणी विश्लेषणासाठी हायब्रिड डीप न्यूरल आर्किटेक्चर ( भारत, 19–21 वर्षे ) – कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित डिसआर्थ्रिया शोध प्रणाली
● इंडेक्स – इंटेलिजंट न्यूरोअॅडॅप्टिव्ह डायग्नोस्टिक एन्हान्समेंट (थायलंड, 16–18 वर्षे) – न्यूरोलॉजिकल तपासणी आणि पुनर्वसन सहाय्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता मंच
● बिष्णुपूरमधील शाश्वत पर्यटनासाठी डीप लर्निंग ( भारत, 19–21 वर्षे ) – कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित वारसा ओळख आणि पर्यटन मंच
● झेड-ट्रॅक्स – झीक्स ट्रॅफिक रेग्युलेशन्स अॅनालिटिक्स आणि स्मार्ट सिटी सोल्यूशन्स ( भारत, 19–21 वर्षे ) – कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम स्मार्ट शहरी वाहतूक व्यवस्थापन प्रणाली
***
अंबादास यादव/नितीन गायकवाड/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2228360)
अभ्यागत कक्ष : 19