पंचायती राज मंत्रालय
पंचायत राज मंत्रालय नवी दिल्ली येथील इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पो 2026 मध्ये तळागाळापर्यंत पोहोचणाऱ्या प्रशासकीय कार्यात कृत्रिम प्रज्ञेचा वापर दाखविणाऱ्या प्रदर्शनाचे करणार आयोजन
प्रात्यक्षिके, प्रतिकृती जन-केंद्रित डिजिटल साधनांचा वापर प्रत्यक्षपणे पहाण्यासाठी आणि परस्परसंवादी सत्रांचे स्टाॅल्स
Posted On:
14 FEB 2026 2:03PM by PIB Mumbai
पंचायती राज मंत्रालय 16 ते 20 फेब्रुवारी 2026 दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम (हॉल क्र.5, बूथ 5F5 आणि 5F9) येथे होणाऱ्या इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पो 2026 मध्ये सहभागी होणार आहे. यामध्ये तळागाळातील प्रशासन मजबूत करण्यासाठी,प्रशासकीय कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि सार्वजनिक सेवा वितरणातील जबाबदारी विकसित करण्यासाठी केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित उपायांचे प्रदर्शन केले जाईल.
या प्रदर्शनात दाखवल्या जाणाऱ्या एआय सोल्यूशन्समध्ये सभासार - ग्रामसभा आणि अधिकृत बैठकांचे रेकॉर्डिंग, लिप्यंतरण आणि सारांश संरचित, अचूक आणि कृतीयोग्य बैठकीच्या इतिवृत्ताची नोंद करण्यासाठी एआय-संचालित उपाय; प्रमाण (PRAMAN Panchayati Raj Asset Monitoring and Notification, पंचायत राज मालमत्ता देखरेख आणि अधिसूचना) - द्वारे अपलोड केलेल्या मालमत्तांच्या छायाचित्रांचे स्वयंचलित प्रमाणीकरण करण्यासाठी प्रतिमा विश्लेषण-आधारित प्रणाली, ज्यामध्ये गुणवत्ता मूल्यांकन, सत्यता तपासणी आणि डुप्लिकेशन यांचा समावेश आहे; आणि ई-ग्रामसाथी - प्रशासन प्रक्रिया आणि सेवांशी संबंधित माहिती, मार्गदर्शन आणि प्रतिसाद प्रदान करून पंचायत अधिकारी आणि नागरिकांना मदत करण्यासाठी डिझाइन केलेले एआय चॅटबॉट या सेवांची प्रात्यक्षिके सादर होतील.बूथचे मुख्य आकर्षण म्हणजे परस्पर संवाद चर्चासत्रे (इमर्सिव्ह आणि इंटरॅक्टिव्ह एंगेजमेंट फॉरमॅट्स( असतील जे एआय कठीण प्रशासकीय प्रक्रिया कशा सुलभ करते हे दर्शवितात. अभ्यागतांना पारंपरिक पथनाट्य पद्धतीद्वारे एआय-सक्षम निर्णय दस्तऐवजीकरणाचे प्रदर्शन करणारा भूमिका-आधारित परस्परसंवादी प्रतिकृती आणि मार्गदर्शित वॉकथ्रूद्वारे एआय प्लॅटफॉर्मचे थेट कार्यरत प्रात्यक्षिकही 'बी द सरपंच' या प्रत्यक्ष अनुभवाद्वारे घेता येईल.
या प्रदर्शनात, पंचायत आणि स्थानिक प्रशासन स्तरावरील प्रशासकीय आव्हानांना तोंड देणाऱ्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे प्रदर्शन मंत्रालय करेल, तसेच सार्वजनिक प्रणालींमध्ये कृत्रिम प्रज्ञेच्या जबाबदार आणि प्रभावी वापरावरील ध्येय धोरणांबाबतच्या चर्चासत्रांत सहभागी होईल. अभ्यागतांना एका परस्परसंवादी चर्चात्मक सत्राद्वारे प्रदर्शनातील सत्रात स्टॉलवर एआय-सक्षम प्लॅटफॉर्मची थेट प्रात्यक्षिके अनुभवता येतील.ही प्रात्यक्षिके तळागाळातील प्रशासनात व्यावहारिक दृष्टीने कृत्रिम प्रज्ञेच्या अनुप्रयोगांवर आधारित असून सहभागींना सखोल मार्गदर्शन सहभाग प्रदान करणारे प्रत्यक्ष स्थान म्हणून तयार केली आहेत. त्याच्या प्रदर्शनांद्वारे, मंत्रालय प्रभावी प्रशासनाचे सक्षमकर्ता म्हणून एआयला अधोरेखित करणे, स्थानिक सरकारांसाठी मोजता येतील अशा डिजिटल नवकल्पनांचे प्रदर्शन करणे आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा जन-केंद्रित, धोरण-नेतृत्वाने स्वीकार करण्याच्या आपल्या वचनबद्धतेला दुजोरा देण्याचे उद्दिष्ट साध्य करते.

***
शैलेश पाटील/संपदा पाटगावकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2228276)
अभ्यागत कक्ष : 7