अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
प्रधानमंत्री किसान संपदा योजना (पीएमकेएसवाय): 2025-25 मधील वाटप, घटक आणि अंमलबजावणी चौकट
पीएमकेएसवाय अंतर्गत दिला गेलेला निधी
प्रविष्टि तिथि:
13 FEB 2026 4:18PM by PIB Mumbai
अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय केंद्रीय एकछत्री योजना, प्रधानमंत्री किसान संपदा योजना राबवत आहे. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी पीएमकेएसवाय साठी 630 कोटी रुपयांचे निधी वाटप करण्यात आले.
पीएमकेएसवाय अंतर्गत योजनेचे घटक पुढीलप्रमाणे आहेत:
(i) एकात्मिक शीत साखळी आणि मूल्यवर्धन पायाभूत सुविधा (ICC&VAI)
(ii) कृषी-प्रक्रिया समूहांसाठी पायाभूत सुविधा(APC)
(iii) अन्न प्रक्रिया आणि संवर्धन क्षमता (CEFPPC) निर्मिती/विस्तार
(iv) अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता हमी पायाभूत सुविधा(FSQAI)
(v) मानव संसाधन आणि संस्था (संशोधन आणि विकास)
(vi)ऑपरेशन ग्रीन्स(OG)
(vii) भव्य खाद्यपदार्थ केंद्रे(मेगा फूड पार्क्स)(01.04.2021पासून बंद)
(viii) बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजची निर्मिती (01.04.2021 पासून बंद)
पीएमकेएसवाय अंतर्गत, अन्न प्रक्रिया/संरक्षण/चाचणी/विश्लेषण पायाभूत सुविधांची स्थापना करण्यासाठी हिमाचल प्रदेशसह देशभरातील अन्न प्रक्रिया आणि संबंधित क्षेत्रांमध्ये संशोधन आणि विकास उपक्रम राबविण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्या, मालक कंपन्या, भागीदारी तत्त्वाच्या कंपन्या, एलएलपी, सहकारी संस्था/एफपीओ/एफपीसी/एसएचजी यासारख्या पात्र संस्थांना अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य दिले जाते.

पीएमकेएसवाय ही मागणीवर आधारित योजना असून हिमाचल प्रदेशसह देशभरातून स्वारस्याच्या अभिव्यक्तीद्वारे(ईओआय) यासाठी अर्ज मागवले जातात. पीएमकेएसवायच्या कोणत्याही घटक योजनेअंतर्गत निधीचे वाटप/मंजूर/जारी राज्यनिहाय केले जात नाही. प्राप्त झालेल्या प्रस्तावांची पात्रतेसाठी छाननी केली जाते आणि विद्यमान योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार निश्चित केलेल्या निकषांवर आधारित त्यांचे मूल्यांकन केले जाते. निधीच्या उपलब्धतेवर आधारित पात्र प्रस्तावांना गुणवत्ताधारक प्रस्तावांना मंजुरी दिली जाते.
ही माहिती अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंह यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तराद्वारे दिली.
***
सुवर्णा बेडेकर/संपदा पाटगावकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2227712)
आगंतुक पटल : 68