पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान 14 फेब्रुवारी रोजी देणार आसामला भेट


पंतप्रधान प्रथम दिब्रुगडमधील मोरन बायपास येथे  आपत्कालीन परिस्थितीत विमान उतरवण्यासाठी तयार केलेल्या सुविधेवर (ईएलएफ) उतरतील.

ईशान्य भारतातील अशा प्रकारचे हे पहिलेच  ईएलएफ  - नैसर्गिक आपत्तींदरम्यान विमान उतरवण्यासाठी तयार केलेले बांधकाम असून धोरणात्मक गरजा आणि आपत्कालीन प्रतिसादासाठी ते एक महत्त्वाचे स्थान म्हणून काम करेल.

गुवाहाटीमध्ये पंतप्रधान 5450 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत  आणि हिरवा झेंडा दाखवणार आहेत 

ब्रह्मपुत्रा नदीवरील पंडित कुमार भास्कर वर्मा पुलाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

पंतप्रधान आयआयएम गुवाहाटी आणि ईशान्य क्षेत्रासाठी बांधलेल्या राष्ट्रीय माहिती केंद्राचे   उद्घाटन करतील

Posted On: 13 FEB 2026 11:38AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 14 फेब्रुवारी 2026 रोजी आसामला भेट देतील. सकाळी 10:30 वाजता, पंतप्रधान दिब्रुगडमधील मोरन बायपासवरील आपत्कालीन लँडिंग प्लॅटफॉर्मवर (ईएलएफ)  पंतप्रधान उतरतील,  तेथे ते  लढाऊ विमाने, वाहतूक आणि हेलिकॉप्टर यांची हवाई प्रात्यक्षिके पाहतील. दुपारी 1 वाजता, पंतप्रधान ब्रह्मपुत्रा नदीवरील कुमार भास्कर वर्मा सेतूला भेट देतील. त्यानंतर, दुपारी 1:30 वाजता, पंतप्रधान गुवाहाटीतील लाचित घाट येथे 5,450 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि त्यांना हिरवा झेंडा दाखवतील.

ईशान्य भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच आपत्कालीन भूसुविधा आहे. आपत्कालीन परिस्थितीत लष्करी आणि नागरी विमानांना उतरवण्यासाठी आणि टेकऑफला समर्थन देण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या समन्वयाने हे  विशिष्ट रचना करून बांधण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा ईशान्येकडील धोरणात्मक गरजांच्या दरम्यान बचाव आणि मदत कार्य जलद तैनात करण्यास सक्षम करून, आपत्कालीन प्रतिसादासाठी हे एक महत्त्वपूर्ण स्थान म्हणून काम करेल. दुहेरी-वापर पायाभूत सुविधा म्हणून कल्पना केलेली, ELF 40 टन पर्यंतची लढाऊ विमाने आणि 74 टन पर्यंतची जास्तीत जास्त टेकऑफ वजनाची विमाने येथून वाहतूक करण्यास सक्षम आहे.

पंतप्रधान दळणवळणाची गती वाढविणे, डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत करणे, उच्च शिक्षणाला चालना देणे आणि सार्वजनिक वाहतूकीला प्राधान्य  देण्याच्या उद्देशाने विकसित केलेल्या अनेक प्रमुख प्रकल्पांचे उद्घाटन करतील, ज्यामुळे ईशान्येकडील प्रदेशातील विकासाला लक्षणीय चालना मिळेल.

सुमारे 3,030 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या ब्रह्मपुत्रा नदीवरील कुमार भास्कर वर्मा सेतूचे उद्घाटन पंतप्रधान करतील.हा एक सहापदरी (6-लेनचा) एक्स्ट्राडोज्ड प्रीस्ट्रेस्ड काँक्रीट (पीएससी) पूल गुवाहाटीच्या भागांना  उत्तर गुवाहाटीशी जोडतो आणि ईशान्य भारतातील पहिला एक्स्ट्राडोज्ड पूल आहे. यामुळे गुवाहाटी-उत्तर गुवाहाटी दरम्यानचा प्रवास वेळ 7 मिनिटांपर्यंत कमी होईल.या प्रदेशातील उच्च भूकंपप्रवणता लक्षात घेता, या पुलात घर्षण पेंडुलम बेअरिंग्ज वापरून बेस आयसोलेशन केलेल्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे. टिकाऊपणा आणि दीर्घकालीन भक्कम बांधकाम कामगिरी सुनिश्चित करण्यासाठी उच्च-कार्यक्षमता स्टे केबल्सचा यात वापर करण्यात आला आहे. एक्स्ट्राडोज्ड पुलाची रिअल-टाइम स्थिती देखरेख, लवकर नुकसान शोधणे आणि सुधारित सुरक्षितता आणि सेवा आयुष्यासाठी पुलाच्या सक्षमतेची निरंतर देखभाल (ब्रिज हेल्थ मॉनिटरिंग सिस्टम,बीएचएमएस) याचा देखील समावेश करण्यात आला आहे.

पंतप्रधान आसाममधील कामरूप जिल्ह्यातील अमीनगाव येथे ईशान्येकडील प्रदेशासाठी राष्ट्रीय माहिती केंद्राचे (डेटा सेंटर) उद्घाटन करतील. एकूण मंजूर भार 8.5 मेगावॅट आणि सरासरी 10 किलोवॅट प्रति रॅक क्षमता असलेले हे अत्याधुनिक डेटा सेंटर विविध सरकारी विभागांच्या महत्वपूर्ण  मोहिमांच्या अनुप्रयोगांचे आयोजन करेल आणि इतर राष्ट्रीय डेटा सेंटरसाठी आपत्ती पुनर्प्राप्ती केंद्र म्हणून देखील काम करेल. यामुळे ईशान्येकडील सरकारांना आवश्यक नागरिक-केंद्रित सेवांचे डिजिटल पद्धतीने सुलभ वितरण होणे सक्षम केले जाईल. डिजिटल इंडियाच्या दृष्टिकोनाशी सुसंगत, ईशान्येकडील प्रदेशासाठी राष्ट्रीय डेटा सेंटरची ही संकल्पना या प्रदेशाचा आयसीटी कणा मजबूत करण्यासाठी आणि मजबूत, सुरक्षित आणि नेहमीच उपलब्ध अशा डिजिटल पायाभूत सुविधा सुनिश्चित करण्यासाठी एक धोरणात्मक हस्तक्षेप म्हणून करण्यात आली आहे.  ईशान्येकडील प्रदेशात उच्च शिक्षण आणि व्यवस्थापन शिक्षणाला मोठी चालना देण्यासाठी बांधलेल्या आयआयएम गुवाहाटीचे उद्घाटन देखील पंतप्रधान यावेळी करतील.

पंतप्रधान पीएम-ईबस सेवा योजनेअंतर्गत या गुवाहाटी (100), नागपूर (50), भावनगर (50) आणि चंदीगड (25) चार शहरांमधील येथे 225 इलेक्ट्रिक बसेसना हिरवा झेंडा दाखवतील. या चार शहरांमध्ये पीएम-ईबस सेवा योजनेअंतर्गत ई-बस सेवा सुरू झाल्यामुळे, 50 लाखांहून अधिक नागरिकांना स्वच्छ, परवडणाऱ्या आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक सेवांचा लाभ मिळेल तसेच  शहरी गतिमानता वाढून  जीवनमान सुधारेल.

***

नेहा कुलकर्णी / संपदा पाटगावकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2227580) अभ्यागत कक्ष : 17