आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आयुष्मान भारत कार्ड्ससंदर्भात अद्ययावत माहिती
एप्रिल 2020 ते जानेवारी 2026 पर्यंत आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत 35.69 कोटींहून अधिक आयुष्मान कार्ड तयार केली गेली.
आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 31.01.2026 पर्यंत कार्डधारकांच्या उपचारासाठी खाजगी रुग्णालयांतून अधिकृतपणे 1.15लाख कोटी रुपये खर्च करून 5.77 कोटी रुग्णांना रुग्णालयांतून प्रवेश देण्यात आले.
प्रविष्टि तिथि:
13 FEB 2026 1:33PM by PIB Mumbai
गेल्या पाच वर्षांत (म्हणजे एप्रिल 2020 ते जानेवारी 2026 या कालावधीत), आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) अंतर्गत अंदाजे 35.69 कोटी आयुष्मान कार्डे तयार करण्यात आली आहेत. या योजनेअंतर्गत तयार केलेल्या आयुष्मान कार्डांची राज्य/केंद्रशासित प्रदेश निहाय माहिती येथे मिळू शकेल: https://dashboard.nha.gov.in/public/card
31.01.2026, पर्यंत, या योजनेअंतर्गत खाजगी रुग्णालयांतून अधिकृतपणे 1.15 लाख कोटी रुपये खर्चाच्या, 5.77 कोटी रुग्णांना रुग्णालयांतून प्रवेश दिला गेला आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली आहे.
***
सुवर्णा बेडेकर/संपदा पाटगावकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2227495)
आगंतुक पटल : 97