भूविज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संसदेतील प्रश्नोत्तरे : पृथ्वी विज्ञान योजना

Posted On: 11 FEB 2026 11:39PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 फेब्रुवारी 2026

 

पृथ्वी विज्ञान (PRITHVI) योजनेच्या अंमलबजावणीमुळे पृथ्वीभोवतालचे वातावरण, महासागर, हिमावरण (क्रायओस्फेर), भूभौतिकीय प्रणाली यांचे दीर्घकालीन पृथ्वीनिरीक्षण करण्याच्या नेटवर्कच्या संख्यात्मक प्रारुप (मॉडेलिंग) आणि डेटा आत्मसात करण्याच्या क्षमतांमधील प्रगतीसह, त्यांचे लक्षणीय सशक्तीकरण झाले आहे.

पृथ्वी विज्ञान (पृथ्वी) योजनेअंतर्गत, विविध भौगोलिक आणि क्षेत्रांचे नव्याने निरीक्षण करण्यासाठी विविध ठिकाणी साधन उपकरणे  तैनात केली असून त्यांत श्रेणीसुधारणा केल्या गेल्या आहेत. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • 10 एक्स-बँड डॉप्लर वेदर रडार आणि 02 सी-बँड डीडब्ल्यूआर तैनात करुन डॉपलर वेदर रडार (डीडब्ल्यूआर) नेटवर्क 48 डीडब्ल्यूआर पर्यंत वाढवण्यात आले आहे. जागतिक हवामान निरीक्षण यंत्रणेच्या (ग्लोबल क्लायमेट ऑब्झर्विंग सिस्टम,जीसीओएस) अप्पर एअर नेटवर्क (जीयूएएन) आरएस/आरडब्ल्यू स्टेशन्सची संख्या 6 वरून 12 पर्यंत वाढवण्यात आली आहे.62 स्थानकांपैकी 25 ठिकाणचे पायलट बलून (पीबी) स्टेशन्स जीपीएस आधारित पीबी स्टेशन्समध्ये त्यांचे अद्ययावतीकरण  करण्यात आले आहे.विद्यमान स्वयंचलित हवामान केंद्रांच्या (AWS) नेटवर्कला 400 स्वयंचलित हवामान केंद्रे (AWS) जोडण्यात आली आहेत. याशिवाय, देशभरात 200 नवीन कृषी-स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावरील हाय विंड स्पीड रेकॉर्डर नेटवर्क स्थानकांची संख्या 37 स्थानकांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
  • महाराष्ट्रात 18 शासकीय विभागीय आणि 24 बिगर-शासकीय विभागीय वेधशाळा, 85 स्वयंचलित हवामान केंद्रे (AWS), 10 कृषी-स्वयंचलित हवामान केंद्रे (AWS), 125 स्वयंचलित पर्जन्यमापक (ARG) केंद्रे आणि 350 जिल्हा पर्जन्यमान देखरेख केंद्रे (DRMS) आहेत. तसेच, महाराष्ट्र राज्य सरकारने मंडळ स्तरावर 2321 स्वयंचलित हवामान केंद्रे (AWS) स्थापन केली आहेत ज्यात जळगाव जिल्ह्यातील 86 केंद्रे समाविष्ट आहेत. शिवाय, महाराष्ट्रात 9 डॉपलर हवामान रडार (DWR) कार्यरत आहेत, हे रडार नेटवर्क जळगाव लोकसभा मतदारसंघातील काही भागांना देखील जोडलेले आहे. याची माहिती परिशिष्ट 1 मध्ये दिली आहे.
  • 31 आर्गो फ्लोट्स, 5 सरफेस ड्रिफ्टर्सची स्थापना, 17 कोस्टल अकॉस्टिक डॉप्लर करंट प्रोफाइलर (ADCP) मूरिंग्जची देखभाल, 3 इक्वेटोरियल करंट मीटर मूरिंग्ज आणि 3 सह इन-सिटू ओशन ऑब्झर्वेशन नेटवर्क 3XBT (एक्सपेंडेबल बाथीथर्मोग्राफ) ट्रान्सेक्ट्स, GNSS (ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम्स) 15भरती-मापक ठिकाणी सुरू केली आहेत आणि 14 नवीन भरती-ओहोटी स्टेशन्स स्थापन केली आहेत.
  • 17 प्लॅटफॉर्मर्सवर  वेव्ह-रायडर नेटवर्कचा विस्तार करण्यात आला आहे, ज्यामध्ये मॉरिशसमधील एका नवीन बोयाचा समावेश आहे, तर अंदमान आणि निकोबार बेटांमधील GNSS– (स्ट्राँग मोशन अ‍ॅक्सिलरोमीटर) SMA नेटवर्कला पूर्वेकडील बेटावर अतिरिक्त GNSS स्टेशनसह सक्षम करण्यात आले आहे.
  • प्रगत रिअल-टाइम मॉडेलिंग सक्षम करण्यासाठी, इनकॉईसने (INCOIS) एचपीएस- तरंग(HPC–Tarang), ही एक समर्पित उच्च-कार्यक्षमता संगणकीय प्रणाली, महासागर अंदाजासाठी कार्यरत  केली आहे.
  • हिमालयातील, चंद्रा खोऱ्यात  AWS आणि WLR (वॉटर लेव्हल रेकॉर्डर्स) सह एकात्मिक हिमनदी-जलविज्ञान देखरेख प्रणाली स्थापित केल्या गेल्या आहेत आणि त्यांचा अरुणाचल प्रदेशपर्यंत विस्तार  केला गेला आहे, जी हिमनदी वस्तुमान संतुलन अंदाजासाठी प्रगत रिमोट सेन्सिंग आणि xDEM-आधारित संसाधनानी युक्त आहे.
  • देशभरात भूकंप प्रवणता ओळखण्याचे जाळे 165 कार्यरत केंद्रांपर्यंत विस्तारले आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील 15 समाविष्ट आहेत. महाराष्ट्रातील भूकंप वेधशाळांची माहिती परिशिष्ट १ मध्ये दिली आहे.

विविध राज्ये आणि संबंधित मंत्रालयांना प्रदान केलेल्या हवामान, पर्जन्यमान, महासागर, भूकंप आणि आपत्ती अंदाज सेवांमध्ये मोजण्यायोग्य अशा सुधारणा साध्य झाल्या आहेत. अलिकडच्या दशकात हवामानातील गंभीर  घटनांसाठी अंदाज बांधण्याची  अचूकता 40% नी वाढली आहे, 2025 च्या मान्सून दरम्यान एक दिवसापूर्वीच्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यांची अचूकता 85% पर्यंत पोहोचली आहे, जी 2020 मध्ये 77% होती. शीतलहरीच्या अंदाजांची अचूकता 65% पर्यंत वाढली आहे, तर वादळ आणि विजांच्या अंदाजांमध्ये 53% सुधारणा झाली आहे.

चक्रीवादळाच्या अंदाजांमधून अधिक चांगला मागोवा तसेच  त्याची तीव्रता आणि लॅण्डफॉलचे अधिक  चांगले अंदाज दर्शवले गेले.  आधीच्या कमी मुदतीच्या अंदाजांप्रमाणेच उष्णतेच्या लाटेचे अंदाजही अचूक मिळाल्यामुळे तयारीसाठी 2 दिवसांचा अवधी मिळाला.  महासागर निरीक्षण यंत्रणेमुळे सागरी सेवा अधिक दर्जेदार झाल्या, सागर प्रतिकृती अभ्यास यंत्रणेमुळे सागरी हवामानाचे अचूक अंदाज मिळू शकतात,  समुद्र पातळी अंदाज आणि महासागर पुनर्विश्लेषण याद्वारे महासागर सेवा मजबूत केल्या गेल्या.  महासागराची  डिजिटल प्रतिकृती आपत्तीच्या अंदाजासाठी प्रभावीपणे वापरली  जाऊ शकते. समुद्राच्या पातळीत वाढ, प्रतिकूल वादळी परिस्थिती आणि हवामान बदलाच्या परिस्थितींमुळे निर्माण होणारे भरती-ओहोटीचे पूर किनारी क्षेत्रांवरील परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी वापरले जातात. भूकंपशास्त्र सेवा केंद्रांची संख्या वाढली असून ती अधिक प्रगत झाली आहेत. त्यामुळे 3.0 आणि त्याहून अधिक तीव्रतेच्या भूकंपांचा शोध घेणे शक्य झाले आहे.  जोखीम कमी करण्यासाठी 12 शहरांमध्ये  भूकंपीय सूक्ष्म क्षेत्रीकरण पूर्ण झाले आहे. 

ऑगस्ट 2021 पासून वादळाचा इशारा देणारे 9342 कोटी एसएमएस पाठवले गेले होते. नुकत्याच झालेल्या मोन था चक्रीवादळादरम्यान  77.64 कोटी एसेमएस संबंधित जनतेला पाठवले गेले. या सर्व सुधारणांमुळे हवामान अंदाजाची अचूकता वाढली असून प्रतिकूल हवामानामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही कमी झाली आहे. उदाहरणार्थ, ओडिशामध्ये 1999 साली झालेल्या सुपर सायक्लोन मध्ये 7 हजार लोकांचे मृत्यू  झाले होते, परंतु गेल्या काही वर्षातील चक्रीवादळांमध्ये 100 हुन कमी मृत्यूंची नोंद झाली आहे. एका चक्रीवादळाच्या अचूक अंदाजामुळे मृतांच्या कुटुंबियांना दिल्या जाणाऱ्या मदतीपोटी होणारा, तसेच लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी होणारा, शिवाय  वीज, नौकानयन, उड्डाण, रेल्वे इत्यादींचे नुकसान न झाल्याने  सुमारे 1100 कोटी रुपयांचा खर्च वाचतो. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांमध्ये उष्णतेच्या लाटेचा अचूक अंदाज वर्तवल्यामुळे जीवितहानी कमी झाली आहे.   

ऍटमॉसफिअर, हायड्रोस्फिअर, जिओस्फिअर, क्रायोस्फिअर व बायोस्फिअर या पर्यावरणाच्या पाच घटकांबद्दल माहिती पुरवणाऱ्या पृथ्वी योजनेमुळे पृथ्वी व्यवस्था शास्त्राचा अभ्यास अद्ययावत होतो आहे. जमीन व सागरावरील हवामानाचे अंदाज, विषुववृत्तीय चक्रीवादळे, वादळी वाऱ्यांमधील वाढ, पूर. उष्णतेच्या लाटा, वादळे व विजांचा कडकडाट , सुनामी तसेच भूकंपांचाही अंदाज या सेवांमध्ये मिळू शकतो. 

भारताची आपत्तीविषयक सज्जता वाढवण्यासाठी तसेच शेती व जलस्त्रोतांचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी सरकारने एक संस्थागत यंत्रणा उभारली असून तिच्या माध्यमातून हवामान निरीक्षण संरचना सुधारली आहे. नवीन पद्धती व तंत्रज्ञान स्वीकारून सर्व  प्रकारची माहिती एकत्र करून, गणितीय संस्कार झाल्यावर विपरीत हवामानाचे  अंदाज , सूचना आणि इशारे संबंधित भागांपर्यंत पोचवले जातात. 

भारतीय हवामान विभाग (IMD) द्वारे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि सेंटर ऑफ डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स यांच्या समन्वयाने इशाऱ्यांचा प्रसार आणि संप्रेषण करण्यासाठी मंत्रालय आवश्यक कृती करते. मानक कार्यप्रणाली (SOP) नुसार, आयएमडी मुसळधार पाऊस, चक्रीवादळ, वीज पडणे, गडगडाट, धूळ वादळ इत्यादी गंभीर हवामान घटनांसाठी SACHET मंच वापरून कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉल इशारे तयार करत आहे. हे इशारे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) द्वारे विशिष्ट भागातील वापरकर्त्यांना SMS द्वारे प्रसारित केले जातात. हे इशारे SACHET वेबसाइट आणि SACHET मोबाइल अॅपद्वारे देखील प्रसारित केले जातात. आयएमडी चे CAP फीड ग्लोबल मल्टी-हॅझर्ड अलर्ट सिस्टम , गुगल, अ‍ॅक्यूवेदर आणि अ‍ॅपलला देखील प्रसारित केले जातात.

भारत सरकारने  अलीकडेच ग्राम पंचायत स्तरावरील हवामान अंदाज (GPLWF) उपक्रम सुरू केला आहे. IMD ने पंचायती राज मंत्रालयाच्या (MoPR) सहकार्याने 24 ऑक्टोबर 2024 रोजी भारतातील जवळजवळ सर्व ग्रामपंचायतींसाठी GPLWF सुरू केले. हे अंदाज e-Gramswaraj (https://egramswaraj.gov.in/), मेरी पंचायत अॅप, MoPR चे ई-मंचचित्र आणि IMD चे मौसमग्राम (https://mausamgram.imd.gov.in/) सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.

राज्य संस्था (केंद्रीय जल आयोग, राज्य सिंचन विभाग, एसडीएमए, जलसंपदा विभाग, कृषी आणि जल मंडळे, कालवा आणि कमांड क्षेत्र प्राधिकरणे आणि आंतरराज्यीय जल मंडळे) जलसंपदा व्यवस्थापनासाठी पृथ्वी च्या अंदाजाचा वापर करुन, जलाशय व्यवस्थापन, पूर आणि दुष्काळ तयारी तसेच सिंचन नियोजनात करतात. जलाशय अधिकारी पावसाच्या अंदाजांवर आधारित पाण्याच्या विसर्गाचे  नियमन करतात, तर पूरप्रवण प्रदेशांना वेळेवर कारवाईसाठी लवकर सूचना मिळतात. भूजल पुनर्भरण आणि पाण्याच्या नियंत्रित वितरणासाठी हंगामी अंदाजांमुळे  मार्गदर्शन मिळते. पाण्याचे वितरण करण्यासाठी  सिंचन विभाग कालव्यातील विसर्गाचे वेळापत्रक तयार करतो . खोरे-स्तरीय अंदाजांमुळे आंतरराज्यीय पाणी वाटपासाठी मार्गदर्शन मिळते. अशा प्रकारे  कार्यक्षम आणि लवचिक पाणी व्यवस्थापनासाठी ‘पृथ्वी’  हे एक प्रमुख साधन बनते.

Annexure I

Details of the Doppler Weather Radars (DWRs) in Maharashtra

S.No

State

Location

  1.  

Maharashtra

Mumbai

  1.  

Maharashtra

Nagpur

  1.  

Maharashtra

IITM Solapur

  1.  

Maharashtra

Veravali

  1.  

Maharashtra

Mumbai, Juhu (IITM*)

  1.  

Maharashtra

Mumbai, Panvel (IITM)

  1.  

Maharashtra

Mumbai, Kalyan, Dombivali (IITM)

  1.  

Maharashtra

Mumbai, Vasai, Virar (IITM)

  1.  

Maharashtra

Mahabaleshwar (IITM)

 

*Indian Institute of Tropical Meteorology (IITM), Pune

 

Details of Seismic observatories in Maharashtra

S N

Station

Latitude (oN)

Longitude (oE)

 Date of Installation

Date of Upgradation /Modernisation

1

Akola

20.7017

77.0146

25.04.1983

19.11.2015

2

Karad

17.3077

74.1835

01.01.1970

21.11.2015

3

Latur

18.4104

76.5333

20.12.1993

24.11.2015

4

Mumbai

18.8975

72.8127

01.01.1899

20.10.2015

5

Nagpur

21.1699

79.0509

08.12.1988

14.06.2016

6

Pune

18.5300

73.8490

01.01.1949

21.12.2007

7

Solapur

17.6703

75.9229

11.07.2021

11.07.2021

8

Hingoli

19.6542

77.0943

14.07.2021

14.07.2021

9

Nashik

20.0299

73.7983

18.07.2021

18.07.2021

10

Palghar

20.0348

72.9133

22.07.2021

22.07.2021

11

Taliye

17.3419

73.7829

04.01.2022

04.01.2022

12

Govare

17.3468

73.7379

21.12.2021

21.12.2021

13

Panderpani

17.2692

73.7623

06-02-2024

06-02-2024

14

Pathurpunj

17.3011

73.6991

06-02-2024

06-02-2024

15

Atoli

17.2898

73.7686

06-02-2024

06-02-2024

 

* * *

नेहा कुलकर्णी/उमा रायकर/संपदा पाटगावकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2227000) अभ्यागत कक्ष : 6