अंतराळ विभाग
azadi ka amrit mahotsav

संसद प्रश्नोत्तरे : भारतातील अंतराळ स्टार्ट-अप्स

Posted On: 11 FEB 2026 3:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 फेब्रुवारी 2026

 

भारतात 2014 मध्ये नोंदणीकृत स्पेस स्टार्ट-अप्सची संख्या केवळ एकच होती, ती आजपर्यंत 400 हून अधिक झाली आहे. 2016 मध्ये स्टार्टअप इंडिया उपक्रमाची घोषणा झाल्यानंतर, देशांतर्गत नवोन्मेषाला चालना मिळाली आहे आणि समर्थन तसेच निधी मिळून,  सुलभ नियामक चौकट प्रदान करून एक मजबूत स्टार्टअप परिसंस्था तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवून, अवकाश क्षेत्राशी संबंधित स्टार्टअप्समध्येही मोठी वाढ झाली आहे. देशात 2014 नंतर अनेक स्टार्टअप्स सुरू झाले असून त्यातील प्रमुख अंतराळ क्षेत्रातील स्टार्टअप्सची नावे मेसर्स पिक्सेल, मेसर्स ध्रुव, मेसर्स स्कायरूट एरोस्पेस, मेसर्स अग्निकुल कॉसमॉस, मेसर्स बेलाट्रिक्स एरोस्पेस ही आहेत.

Sl. No.

Scheme /policy

Year

1.

Indian Space Policy

2023

2.

Liberated FDI Policy

2024

3.

Norms, Guidelines and Procedures for Authorization

2024

4.

IN-SPACe Seed Fund Scheme

2023

5.

IN-SPACe Pre-incubation Entrepreneurship (PIE) Program

2024

6.

Establishment of Rs.1000 Cr Venture Capital Fund

2024

7.

Establishment of Rs. 500 Crores Technology Adoption Fund (TAF)

2025

8.

Technology Transfer of Small Satellite Launch Vehicle (SSLV) to HAL

2025

9.

Establishment of Earth Observation (EO) satellite constellation on PPP model

2026

 

अवकाश तंत्रज्ञानाच्या सर्व क्षेत्रात, म्हणजेच अप, डाउन आणि मिड-स्ट्रीममध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे.

अवकाश क्षेत्रातील खाजगी क्षेत्राच्या सहभागात लक्षणीय वाढ झाल्याने, मिळालेले यश स्पष्टपणे दिसून येते. तथापि, आतापर्यंत मिळालेल्या प्रमुख यशस्वी उपक्रमांचीची यादी पुढे दिली आहे:

  1. अंतराळातील स्टार्ट-अप्सची संख्या 400 पेक्षा जास्त झाली आहे.
  2. अंतराळातील स्टार्ट-अप्समधील गुंतवणूक 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त झाली आहे.
  3. नोव्हेंबर 2022 आणि मे 2024 मध्ये दोन खाजगी क्षेत्रातील कंपन्यांनी त्यांच्या प्रक्षेपण वाहनांची चाचणी घेतली आणि त्यांचे अंतराळातील उप-कक्षेतील कक्षेत उड्डाण केले. 
  4. ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल (POEM) वर एकूण 25 पेलोड प्रक्षेपित केले गेले  /प्रक्षेपित होणार आहेत जे NGE ला त्यांच्या पेलोडची अंतराळ उड्डाणाची योग्यता तपासण्यास आणि सिद्ध करण्यास मदत करतात.
  5. भारतात एकूण 6  गैर-सरकारी संस्थांनी (NGEs) 18 उपग्रह कक्षेत प्रक्षेपित केले आहेत.
  6. पीपीपी मॉडेलवर पृथ्वी निरीक्षण (ईओ) उपग्रह नक्षत्रांच्या स्थापनेला मंजुरी मिळाल्याने नवोपक्रमांना चालना मिळेल आणि आपल्या भारतीय अंतराळ तंत्रज्ञान कंपन्यांवरील   जागतिक विश्वास वाढेल.
  7. SSLV च्या तंत्रज्ञान हस्तांतरणासह प्रक्षेपण वाहनांचा उच्च थ्रूपुट वाढला आहे 
  8. POEM सारख्या प्लॅटफॉर्मचा लाभ  घेऊन 25 कंपन्या आधीच त्यांच्या उपग्रहांची/उपप्रणालींची अंतराळाच्या प्रत्यक्ष वातावरणात चाचणी करत आहेत.
  9. विविध राज्यांतील सरकार अंतरिक्षाला  एक उदयोन्मुख क्षेत्र म्हणून पाहत असून  प्रोत्साहन योजनांच्या माध्यमातून या क्षेत्रातील कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सक्रिय धोरणे आखत आहेत.
  10. भारतीय अंतराळ कंपन्या हळूहळू जागतिक अवकाश आणि अंतराळ पुरवठा साखळींमध्ये सामील होऊ लागल्या आहेत.

ही माहिती कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन आणि पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली आहे.

 

* * *

नेहा कुलकर्णी/संपदा पाटगावकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2226385) अभ्यागत कक्ष : 29