रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
ॲडव्हान्टेज विदर्भ 2026 च्या दुसऱ्या दिवशी महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या, 6,000 पेक्षा जास्त रोजगारांची निर्मिती आणि प्रादेशिक विकासाला बळकटी
प्रविष्टि तिथि:
07 FEB 2026 5:18PM by PIB Mumbai
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नागपूर येथील 'ॲडव्हान्टेज विदर्भ 2026 – खासदार औद्योगिक महोत्सवा'च्या दुसऱ्या दिवशी तीन महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करून एक ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला, ज्यामुळे विदर्भ एक प्रमुख गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येत असल्याचे ठळकपणे अधोरेखित झाले.
गॅलेक्सी सोलर एनर्जी प्रा. लिमिटेडने नागपूर जिल्ह्यात एकात्मिक सौर आणि बॅटरी ऊर्जा साठवणूक प्रणाली (बीईएस एस) उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत 10,080 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार केला. जी आर इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेडने नागपूरमध्ये टॉवर उत्पादन प्रकल्प स्थापन करण्यासाठी 200 कोटी रुपयांचा सामंजस्य करार केला. याव्यतिरिक्त, मेसर्स क्वालिटी केअर इंडिया लिमिटेड (केअर ग्रुप) ने पीपीपी मॉडेल अंतर्गत, कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशनजवळ 600 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीसह 350 पेक्षा जास्त खाटांचे मल्टी-स्पेशालिटी रुग्णालय विकसित करण्यासाठी महा-मेट्रोसोबत भागीदारी केली आहे.
ही महत्त्वपूर्ण भागीदारी शक्य केल्याबद्दल उद्योग भागीदार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गडकरी यांनी मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की या उपक्रमांमुळे 6,000 पेक्षा जास्त रोजगाराच्या संधी निर्माण होतील, पायाभूत सुविधांच्या विस्ताराला गती मिळेल आणि प्रादेशिक पुरवठा साखळी मजबूत होईल, ज्यामुळे विदर्भात स्वच्छ ऊर्जा नेतृत्व, प्रगत उत्पादन आणि जागतिक दर्जाच्या शहरी आरोग्यसेवेच्या दिशेने एक निर्णायक पाऊल टाकले जाईल.
***
माधुरी पांगे/नंदिनी मथुरे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2224949)
आगंतुक पटल : 76