वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारतीय परदेशी व्यापार संस्थेच्या दिल्ली येथील आवारात ‘पिच परफेक्ट ऑस्ट्रेलिया-भारत' बिझनेस केस स्टडीज या संग्रहाचे प्रकाशन
Posted On:
06 FEB 2026 11:31AM by PIB Mumbai
“पिच परफेक्ट ऑस्ट्रेलिया-भारत: 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या भागीदारीसाठी परिपूर्ण परिस्थिती", या शीर्षकाखालील भारत-ऑस्ट्रेलिया बिझनेस केस स्टडीज, पुस्तकाचे भारतीय परदेशी व्यापार संस्थेच्या दिल्ली येथील आवारात प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाद्वारे दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्याच्या पुढील टप्प्यावर चर्चा करण्यासाठी धोरणकर्ते, राजनैतिक व्यक्ती, उद्योगधुरीण आणि शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र आल्या आहेत.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड (आयआयएफटी) आणि न्यूलँड ग्लोबल ग्रुप यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या या संकलनाद्वारे भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये कार्यरत असलेल्या कंपन्यांच्या प्रत्यक्ष व्यवसाय प्रवासाचे वास्तववादी वर्णन केले आहे. हे प्रकाशन भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये कार्यरत असलेल्या कंपन्यांच्या वास्तविक व्यवसाय प्रवासाचे वर्णन करते, ज्यामध्ये बाजारपेठेतील प्रवेशाचे अनुभव, विकासाची धोरणे आणि दोन्ही बाजारपेठांमध्ये असलेल्या संधींचा यशस्वीरित्या उपयोग करणाऱ्या 30 संस्थांकडून मिळालेले धडे समाविष्ट आहेत.
धोरण, उद्योग आणि शैक्षणिक भागधारकांसाठी यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आयआयएफटी ने केलेल्या प्रयत्नांचे वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केली प्रशंसा आहे.
“व्यापार करारामुळे खऱ्या संधी कशा निर्माण झाल्या आहेत आणि व्यावसायिकांनी त्यांचा विकासासाठी वापर कसा केला आहे यावरील उदाहरणे पुराव्यासह यात समाविष्ट केली आहेत", असे ते यावेळी ते म्हणाले.“भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारांचे (इसीटीए) लाभ मजबूत करण्यात आणि वाढविण्यात हे महत्त्वाची भूमिका बजावेल”असेही त्यांनी नमूद केले.
भारतातील ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त, ओएएम फिलिप ग्रीन यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि द्विपक्षीय व्यापारावर माहितीपूर्ण संवाद वाढवण्यातील आयआयएफटीची भूमिका विशद करून सांगितली.“भारत आणि ऑस्ट्रेलियामधील मजबूत धोरणात्मक संबंधांसाठी शैक्षणिक, सरकार आणि उद्योगांना एकत्र आणणारे व्यासपीठ महत्त्वाचे आहेत, असे त्यांनी सांगितले.
संयुक्त सचिव पेटल धिलॉं यांनी भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक संबंधांमधील वाढत्या व्यवहारांवर प्रकाश टाकला. "आयआयएफटीने संशोधन-आधारित अंतर्दृष्टी निर्माण करण्यात आणि भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारांचे (इसीटीए) सबलीकरण आणि वर्धित वापरास समर्थन देणारे संवाद सुलभ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे." असे त्यांनी नमूद केले.
खऱ्या व्यावसायिक प्रवासांचे दस्तऐवजीकरण करणे आणि त्यांचे उद्योग तसेच शैक्षणिक क्षेत्रासाठी शैक्षणिक संसाधनांमध्ये रूपांतर करणे किती महत्वाचे आहे ही बाब भारतीय परकीय व्यापार संस्थेचे (आयआयएफटी) कुलगुरू प्रा. राकेश मोहन जोशी यांनी ठळकपणे अधोरेखित केली. अशा सहकार्यपूर्ण भागिदारीतून संशोधन आणि सराव यांमधील अंतर कमी करत, जागतिक व्यापारात भारताचा विस्तारत असलेल्या अस्तित्वाला पाठबळ देण्याची भारतीय परकीय व्यापार संस्थेच्या वचनबद्धता दिसून येते असे त्यांनी नमूद केले.
ऑस्ट्रेलियातील न्यूलँड ग्लोबल ग्रुपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेन रुघानी यांनी सखोल द्विपक्षीय संवादासाठी व्यवसायावर आधारित प्रत्यक्ष उदाहरणांची (केस स्टडीज) भूमिका मांडली. तर न्यूलँड ग्लोबल ग्रुपच्या कार्यकारी संचालक नताशा झा भास्कर यांनी दोन्ही देशांच्या बाजारपेठांमध्ये कार्यरत असलेल्या कंपन्यांच्या यशोगाथा आणि त्यातून मिळालेल्या शिकवणी विषयी सादरीकरण केले. समारोपाच्या वेळी दोन्ही देशांतील सरकार, व्यापारी संस्था आणि कंपन्यांच्या प्रतिनिधींचा सहभाग असलेल्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर भागधारकांमधील परस्पर संपर्क विस्तारासाठीचा संवाद झाला.
राजदूत अनिल वाधवा यांनी या केस कंपेंडियमची प्रशंसा केली. भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक संबंध मजबूत करण्याच्या दृष्टीने हे एक अर्थपूर्ण पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले. भारत आणि ऑस्ट्रेलियामधील आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशावेळी नवीन संधी ओळखून, आव्हानावर मात करून आणि परस्परांमधील यशस्वी सहकार्याची उदाहरणे समोर आणणारा हा संग्रह उद्योग व्यवसाय, धोरणकर्ते आणि संशोधकांसाठी एक व्यावहारिक संसाधन म्हणून उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
केंद्र सरकारने 1963 मध्ये वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत भारतीय परकीय व्यापार संस्थेची (आयआयएफटी) स्थापना केली होती. ही संस्था, शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि सल्लामसलतीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय व्यापाराची क्षमता वाढवण्यासाठी समर्पित असलेली एक प्रमुख संस्था आहे. या संस्थेला 2002 मध्ये अभिमत विद्यापीठाचा दर्जा बहाल करण्यात आला होता. या संस्थेने भारताचा परकीय व्यापार आणि जागतिक उद्योग व्यवसायातील सहभागासाठी मनुष्यबळ तसेच ज्ञान विषय आराखडा विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

***
नितीन फुल्लुके/संपदा पाटगावकर/तुषार पवार/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2224765)
अभ्यागत कक्ष : 4