रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘ॲडव्हान्टेज विदर्भ 2026’ चे उद्घाटन
खासदार औद्योगिक महोत्सवाचा पहिल्याच दिवशी 3 ऐतिहासिक सामंजस्य कराराने प्रारंभ
Posted On:
06 FEB 2026 5:56PM by PIB Mumbai
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'ॲडव्हान्टेज विदर्भ 2026 या खासदार औद्योगिक महोत्सवा'ने पहिल्याच दिवशी 3 महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करून एक महत्त्वाचा टप्पा गाठला.
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने बहु-श्रेणी वाहनांसाठी नवीन उत्पादन सुविधा उभारण्याकरिता 15,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली. सुपर स्मेल्टर्स लिमिटेडने गडचिरोलीमध्ये 10,100 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एकात्मिक पोलाद प्रकल्प उभारण्यासाठी सामंजस्य करार केला ज्यामुळे या प्रदेशातील मूळ औद्योगिक परिसंस्था आणखी मजबूत होईल. याव्यतिरिक्त, ग्लोबल इंडिया बिझनेस कॉरिडॉर (जीआयबीसी) आणि असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी), नागपूर यांनी विदर्भ, महाराष्ट्र आणि जागतिक बाजारपेठांमधील व्यापार, गुंतवणूक, नवोन्मेष आणि औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी धोरणात्मक सहकार्य केले आहे.
ही भागीदारी सुलभ केल्याबद्दल सर्व उद्योग भागीदारांचे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गडकरी यांनी मनःपूर्वक आभार मानले. हे करार रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि पुरवठा साखळीच्या वाढीला गती देतील आणि विदर्भ तसेच भारताच्या जागतिक उत्पादन क्षेत्रातील स्पर्धात्मकता वाढवतील, असे ते म्हणाले.
***
शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2224736)
अभ्यागत कक्ष : 9