पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डिजिटल पर्यटन व्यासपीठ

Posted On: 05 FEB 2026 3:41PM by PIB Mumbai


भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, नैसर्गिक सौंदर्य आणि विविध आकर्षणांविषयी सखोलपणे समजून घेण्यासाठी उत्सुक असलेले पर्यटक आणि संबंधित भागधारकांकरता एका व्यापक स्त्रोत उपलब्ध करून द्यावा या उद्देशाने केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने इन्क्रेडिबल इंडिया डिजिटल प्लॅटफॉर्मची (आयआयडीपी) सुधारित आवृत्ती आणली आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून पर्यटकांना देशातील संस्कृती, वारसा, साहसी पर्यटन, खाद्यसंस्कृती, आरोग्यविषयक कल्याण, कला आणि हस्तकला तसेच ग्रामीण पर्यटनासह विविध पर्यटन स्थळांचा आभासी पद्धतीने अनुभव घेण्याची संधी मिळते. या व्यासपीठाअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ताधारीत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यावर हवामान विषयक वास्तविक घडामोडींची माहिती, शहरे पाहता येण्याची सोय आणि प्रवासासाठीच्या आवश्यक सेवांच्या माध्यमातून पर्यटकांना वैयक्तिकृत अनुभव घेण्याची संधी मिळते. या व्यासपीठाअंतर्गत डिजिटल मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी एक माहिती केंद्राचाही अंतर्भाव केलेला आहे.
यासोबतच विमाने, हॉटेल्स, टॅक्सी आणि बसेसचे सुरळीतपणे आरक्षण करण्यासाठी तसेच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या स्मारकांची तिकिटे उपलब्ध करून देण्यासाठी या पोर्टलने अनेक ऑनलाइन ट्रॅव्हल एजंट्स आणि भागधारकांसोबत भागीदारी केली आहे. नोंदणीकृत टूर ऑपरेटर्स आणि ट्रॅव्हल एजंट्सची माहिती उपलब्ध करून देण्याकरता  हे पोर्टल नॅशनल इंटिग्रेटेड डेटाबेस ऑफ हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री (निधी) पोर्टलशी देखील जोडण्यात आले आहे.

केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

*** 

नितीन फुल्लुके / तुषार पवार / परशुराम कोर


(Release ID: 2224458) अभ्यागत कक्ष : 7