पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पवित्र देवनिमोरी अवशेष दर्शनार्थ खुले केल्याबद्दल पंतप्रधानांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतींकडे व्यक्त केली कृतज्ञता

Posted On: 05 FEB 2026 5:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2026

कोलंबो येथील पवित्र गंगारामया मंदिरात पवित्र देवनिमोरी अवशेष दर्शनार्थ खुले केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती महामहिम अनुरा कुमार दिसानायके यांच्याकडे कृतज्ञता व्यक्त केली आहे.

एप्रिल 2025 मध्ये त्यांच्या श्रीलंका दौऱ्यादरम्यान, हे पूजनीय अवशेष श्रीलंकेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता,जेणेकरून लोकांना आदरांजली वाहण्याची संधी मिळेल,याचे पंतप्रधानांनी स्मरण केले. 

शतकानुशतकांचा सामायिक वारसा आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांनी भारत आणि श्रीलंका हे एकमेकांसोबत गहन सांस्कृतिक आणि आध्यात्मिक बंधांनी बांधले गेलेले आहेत, यावर  मोदी यांनी भर दिला. श्रीलंकेत पवित्र देवनिमोरी अवशेषांचे आगमन हे दोन्ही राष्ट्रांमधील शाश्वत आध्यात्मिक बंधाचे प्रतीक आहे, असे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

भगवान बुद्धांचा करुणा, शांती आणि सौहार्दाचा कालातीत संदेश मानवतेला मार्गदर्शन करत राहील, सीमा ओलांडून एकता आणि समंजसपणा वर्धिष्णु करत राहील अशी आशा पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली.

आपल्या विविध एक्स पोस्टमध्ये मोदी म्हणाले:

“कोलंबो येथील पवित्र गंगारामया मंदिरात पवित्र देवनिमोरी अवशेष दर्शनार्थ खुले केल्याबद्दल  राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांचे आभार”. 

एप्रिल 2025 मध्ये माझ्या भेटीदरम्यान, हे अवशेष श्रीलंकेत आणण्याचे ठरले होते, ज्यामुळे लोकांना आदरांजली वाहण्याची संधी मिळेल. आपण दोन्ही राष्ट्रे गहन सांस्कृतिक आणि आध्यात्मिक बंधांनी जोडलेले आहोत. भगवान बुद्धांचा करुणा, शांती आणि सौहार्दाचा कालातीत संदेश मानवतेला मार्गदर्शन करत राहो.

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2222243&reg=3&lang=1


नेहा कुलकर्णी /संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2223920) अभ्यागत कक्ष : 3