औषधनिर्मिती विभाग
azadi ka amrit mahotsav

कोकण विभागातील जनऔषधी केंद्रे

Posted On: 03 FEB 2026 5:29PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी 2026

प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजना (पीएमबीजेपी) या योजने अंतर्गत 31 डिसेंबर 2025 पर्यंत महाराष्ट्रातील रायगडसिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात अनुक्रमे 12, 3 आणि 4 जनऔषधी केंद्रे (जेएकेउघडण्यात आली.

योजनेचा व्याप्ती आणखी वाढवण्यासाठी आणि नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठीसरकारने मार्च 2027 पर्यंत 25,000 जनऔषधी केंद्रे उघडण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. वैयक्तिक उद्योजकस्वयंसेवी संस्थासोसायटीट्रस्टफर्मखासगी कंपन्या इत्यादींकडून अर्ज मागवून जनऔषधी केंद्रे  उघडली जातात. महाराष्ट्र राज्यासह देशातील सर्व जिल्ह्यांमधून पुढील संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत: www.janaushadhi.gov.in.

जनऔषधी केंद्रे  ही ग्राहकांना थेट औषधे विकणारी किरकोळ दुकाने आहेत. नागरिकांची गरज आणि डॉक्टरांकडून मिळालेल्या प्रिस्क्रिप्शनवर जनऔषधी केंद्रांमधील नागरिकांची भेट अवलंबून असते. तथापिअंदाजे 15 लाख नागरिक दररोज देशभरातील जनऔषधी केंद्रांना  भेट देतात.

आर्थिक वर्ष 2024-25 मध्येवर नमूद केलेल्या तीन जिल्ह्यांमध्ये उघडलेल्या जनऔषधी केंद्रांद्वारे एकूण 22.98 लाख रुपयांच्या औषधांच्या विक्रीची नोंद करण्यात आलीजिल्हानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:

अनु क्र.

जिल्हा

आर्थिक वर्ष 2024-25 मधील एमआरपी दराने विक्री (लाख रुपये)

1.

रायगड

13.91

2.

सिंधुदुर्ग

2.18

3.

रत्नागिरी

6.89

 

एकूण

22.98

जनऔषधी केंद्रांद्वारे पुरवल्या जाणाऱ्या औषधांची स्वीकारार्हता वाढवण्यासाठीजनौषधी औषधांच्या फायद्यांविषयी जनजागृती मोहिमा नियमितपणे आयोजित केल्या जातात:

i. जनजागृती मोहिमा: फार्मास्युटिकल्स अँड मेडिकल डिव्हायसेस ब्युरो ऑफ इंडिया (पीएमबीआय), ही पीएमबीजेपीची अंमलबजावणी करणारी संस्थाकेंद्रीय संचार ब्युरोपीआयबीमायजीओव्ही आणि माय भारत यासारख्या संस्था आणि व्यासपीठांच्या समन्वयाने मुद्रित, दूरचित्रवाणीरेडिओसोशल मीडिया प्लॅटफॉर्मआउटडोअर होर्डिंग्जसामुदायिक सहभाग इत्यादी विविध माध्यमांद्वारे जागरूकता मोहिमा राबवते.

ii. परस्परसंवादी संदेश/दूरध्वनीजनऔषधी उत्पादनांच्या गुणवत्तेबद्दल आणि जवळच्या जनऔषधी केंद्रामधून खरेदी केल्यामुळे होणाऱ्या मोठ्या बचतीबद्दल नागरिकांना माहिती देण्यासाठी व्हॉटस् अ‍ॅ   चॅटबॉट आणि आउटबाउंड कॉलद्वारे देखील पोहोच वाढवली जाते आणि नागरिकांशी संवाद साधला जातो.

iii. जनऔषधी सप्ताहदरवर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यात जन औषधी सप्ताह साजरा केला जातोया दरम्यान नागरिकआरोग्यसेवा व्यावसायिक आणि इतर भागधारकांना जनौषधी जेनेरिक औषधांच्या फायद्यांबद्दल शिक्षित करण्यासाठी देशभरात सार्वजनिक रॅलीआरोग्य शिबिरेफार्मसी महाविद्यालयांमधील चर्चासत्रेमुलांचा सहभाग असलेले कार्यक्रम यासारख्या  विशेष मोहिमा राबवल्या जातात.

iv. प्रतिष्ठित व्यक्तींचे संदेश: जनऔषधी औषधांचे फायदे अधोरेखित करण्यासाठी आणि त्यांच्या गुणवत्तेशी संबंधित गैरसमज दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रख्यात डॉक्टर यासारख्या सुप्रसिद्ध व्यक्तींचे ऑडिओ/व्हिडिओ संदेश सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित केले जातात.

v. ग्रामीण भागात सार्वजनिक सहभाग कार्यक्रमस्थानिक भाषा/बोलींमध्ये नागरिकांना शिक्षित करण्यासाठीआरोग्य शिबिरेनुक्कड-नाटकसामान्य सेवा केंद्रांमधील दृकश्राव्य प्रदर्शन आणि ग्रामीण भागातील स्थानिक जनऔषधी केंद्रे  यांच्या सहकार्याने सार्वजनिक सहभाग कार्यशाळांच्या माध्यमातून देखील जनजागृती केली जाते.

केंद्रीय रसायने व खते राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

निलीमा चितळे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2222670) अभ्यागत कक्ष : 15