आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करण्यासाठी केलेल्या उपाययोजना
Posted On:
03 FEB 2026 4:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी 2026
नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यासाठीच्या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत 157 सरकारी वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास मान्यता मिळाली असून त्यापैकी 137 वैद्यकीय महाविद्यालये आधीच कार्यरत झाली आहेत.
सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णालये हा राज्याचा विषय आहे. त्यानुसार संबंधित राज्य सरकारे सरकारी रुग्णालयांमधील डॉक्टरांची पुरेशी उपलब्धता आणि आरोग्यसेवा संसाधनांची काळजी घेतात. राज्य सरकारी रुग्णालयांमधील डॉक्टर्स, परिचारिका आणि निम वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांबाबतची माहिती केंद्राकडून संकलित केली जात नाही.
|
Sl.No.
|
Name of Hospital
|
Doctors
|
Nursing Personnel
|
Paramedical Staff
|
|
S
|
F
|
V
|
S
|
F
|
V
|
S
|
F
|
V
|
|
1.
|
VMMC & SJH
|
632
|
513
|
119
|
2759
|
2342
|
417
|
162
|
122
|
40
|
|
2.
|
ABVIMS & Dr. RMLH
|
453
|
351
|
102
|
1559
|
1459
|
100
|
498
|
344
|
154
|
|
3.
|
LHMC & Asso. Hospitals
|
386
|
298
|
88
|
1181
|
959
|
222
|
631
|
384
|
247
|
|
4.
|
RHTC
|
46
|
30
|
16
|
41
|
05
|
36
|
90
|
48
|
42
|
*S- Sanctioned, F- Filled, V- Vacant
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय 'विद्यमान जिल्हा/रेफरल रुग्णालयांसह संलग्न नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यासाठी' केंद्र पुरस्कृत योजनेचे व्यवस्थापन करते, ज्यामध्ये कोणतेही विद्यमान सरकारी किंवा खासगी वैद्यकीय महाविद्यालय नाही अशा आकांक्षी जिल्ह्यांना आणि मागास भागांना प्राधान्य दिले जाते. यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यासाठी निधीचे गुणोत्तर ईशान्येकडील आणि विशेष श्रेणीतील राज्यांसाठी 90:10 असे असते तर इतर राज्यांसाठी ते 60:40 या प्रमाणात असते. केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत 157 सरकारी वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास मान्यता मिळाली असून त्यापैकी 137 वैद्यकीय महाविद्यालये आधीच कार्यरत झाली आहेत.
मनुष्यबळाच्या कमतरतेवर उपाय शोधण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य सेवा पुरवणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकारचे प्रोत्साहन भत्ते आणि मानधन प्रदान केले जाते.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्याकरिता दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनपर भत्त्यांचे आणि मानधनाचे प्रकार
(i)ग्रामीण आणि दुर्गम भागात सेवा देणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांना 'हार्ड एरिया अलाउन्स' दिला जातो.
(ii) ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये तज्ञांची उपलब्धता वाढवण्यासाठी दुर्गम भागात राहून सेवा देणाऱ्या स्त्रीरोगतज्ञ, आपत्कालीन प्रसूती काळजी (EmoC) प्रशिक्षित, बालरोगतज्ञ आणि भूलतज्ञ / जीवनरक्षक भूल कौशल्ये प्रशिक्षित डॉक्टरांना मानधन दिले जाते.
(iii) वेळेवर प्रसूतिपूर्व तपासणी आणि नोंदी सुनिश्चित करण्यासाठी, तसेच किशोरवयीन प्रजनन आणि लैंगिक आरोग्यविषयक उपक्रम राबवण्यासाठी डॉक्टर आणि सहाय्यक परिचारिका-दाई (एएनएम) यांना प्रोत्साहन.
(iv)तज्ञ डॉक्टरांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारांना, वाटाघाटी करून पगार देऊ करण्याला परवानगी आहे त्यामध्ये “आपण सांगा,आम्ही रक्कम देऊ ” यासारख्या धोरणांसह लवचिकता आहे.
(v) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत दुर्गम भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्नातकोत्तर अभ्यासक्रमात प्राधान्य देणे आणि ग्रामीण भागात निवास व्यवस्थेत सुधारणा करणे इत्यादी बिगर आर्थिक प्रोत्साहन दिले जाते.
(vi) तज्ञ डॉक्टरांची कमतरता दूर करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत डॉक्टरांच्या बहु-कौशल्य प्रशिक्षणाला पाठिंबा दिला जातो. आरोग्यविषयक समस्या दूर करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विद्यमान मनुष्यबळाचे कौशल्य अद्यतन आणखी एक धोरण आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2222621)
अभ्यागत कक्ष : 18