अर्थ मंत्रालय
भारत सरकारच्या खात्यांचा डिसेंबर 2025 पर्यंतचा मासिक आढावा (आर्थिक वर्ष 2025-26)
Posted On:
30 JAN 2026 10:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 जानेवारी 2026
भारत सरकारचा डिसेंबर, 2025 पर्यंतचा मासिक लेखा एकत्रित करण्यात आला असून, त्यानुसार अहवाल प्रकाशित करण्यात आले आहेत. त्याचे प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत: -
भारत सरकारला डिसेंबर 2025 पर्यंत ₹25,25,156 कोटी (एकूण प्राप्तींच्या संबंधित 2025-26 च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार 72.2%) प्राप्त झाले आहेत, ज्यात ₹19,39,254कोटी कर महसूल (केंद्राचा निव्वळ वाटा), ₹5,39,855 कोटी करेतर महसूल आणि ₹46,047 कोटी कर्जविरहित भांडवली प्राप्ती यांचा समावेश आहे. या कालावधीत भारत सरकारने राज्य सरकारांना करांच्या वाट्याच्या हस्तांतरणापोटी ₹10,38,164 कोटी हस्तांतरित केले आहेत, जी रक्कम मागील वर्षापेक्षा ₹1,37,014कोटींनी अधिक आहे.
भारत सरकारने केलेला एकूण खर्च ₹33,80,998 कोटी (2025-26च्या संबंधित अर्थसंकल्पीय अंदाजानुसार 66.7%) आहे, त्यापैकी ₹25,93,063 कोटी महसूल खात्यावर आणि ₹7,87,935, कोटी भांडवली खात्यावर खर्च झाले आहेत. एकूण महसूल खर्चापैकी, ₹9,11,059 कोटी व्याज देयकांसाठी आणि ₹3,17,490 कोटी प्रमुख अनुदानांसाठी खर्च झाले आहेत.
* * *
नितीन फुल्लुके/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2221149)
अभ्यागत कक्ष : 59