रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय रेल्वेने तीन विभागांमध्ये 472 किमी मार्गावर ‘कवच 4.0’ सुरक्षा प्रणाली कार्यान्वित करून अंमलबजावणीला दिली गती


एकाच दिवसात कवच प्रणालीचे आतापर्यंतचे सर्वाधिक कार्यान्वयन साध्य

विरार-बडोदा (344 किमी), तुघलकाबाद जंक्शन केबिन–पलवल (35 किमी) आणि मानपूर–सरमातनर (93.3 किमी) विभागांवर ‘कवच 4.0’ कार्यान्वित

भारतीय रेल्वेच्या पाच क्षेत्रांमध्ये 1,300 पेक्षा जास्त मार्ग किलोमीटरवर आता ‘कवच 4.0’ कार्यरत

प्रविष्टि तिथि: 30 JAN 2026 9:24PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जानेवारी  2026

 

भारतीय रेल्वेने आज आपल्या नेटवर्कच्या तीन विभागांमध्ये कवच आवृत्ती 4.0 (स्वयंचलित रेल गाडी  संरक्षण प्रणाली) चे 472.3  मार्ग किलोमीटर कार्यान्वित केले.  यामुळे रेल्वे सुरक्षा मजबूत करण्याच्या दिशेने भारतीय रेल्वेने  आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे. नव्याने कार्यान्वित झालेल्या विभागांमध्ये पश्चिम रेल्वेवरील बडोदा –विरार (344 किमी), उत्तर रेल्वेवरील तुघलकाबाद जंक्शन केबिन–पलवल (35  किमी) आणि पूर्व मध्य रेल्वेवरील मानपूर–सरमातनर (93.3 किमी) यांचा समावेश आहे. या कार्यान्विततेमुळे, भारतीय रेल्वे उच्च-घनतेच्या मार्गांवर  रेल गाडीचे संरक्षण, परिचालन सुरक्षा आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी स्वदेशी कवच प्रणालीच्या अंमलबजावणीला गती देत आहे.

   

या कार्यान्वयनामुळे एकाच दिवसात तसेच एका महिन्यात कवच प्रणालीचे आतापर्यंतचे सर्वाधिक मार्ग किलोमीटर कार्यान्वित झाले आहेत.यामध्‍ये 472.3 मार्ग किलोमीटर कवच आवृत्ती 4.0 अंतर्गत आणले गेले आहेत. यापूर्वीचे सर्वाधिक कार्यान्वयन पश्चिम मध्य रेल्वेच्या कोटा–मथुरा विभागावर 324 मार्ग किलोमीटर होते. या नवीन समावेशामुळे, ‘कवच आवृत्ती 4.0’  आता भारतीय रेल्वेच्या पाच क्षेत्रांमध्ये कार्यान्वित झाली आहे.

आजच्या समावेशानंतर, भारतीय रेल्वेमध्ये कवच आवृत्ती 4.0 एकूण 1,306.3 मार्ग किलोमीटरवर कार्यान्वित झाली आहे. यापूर्वी, कवच आवृत्ती 4.0 ही  834 मार्ग किलोमीटरवर कार्यान्वित करण्यात आली होती.

 

* * *

शैलेश पाटील/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2221090) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी , Gujarati , Kannada