पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
ऊर्जा क्षेत्रातील नवोन्मेष आणि नेतृत्वाला पुरस्काराने गौरवत भारत ऊर्जा सप्ताह 2026 चा समारोप
स्वच्छ ऊर्जा, अपस्ट्रीम तंत्रज्ञान आणि अन्वेषणात योगदान देणाऱ्या प्रतिनिधी आणि नवोन्मेषकांना करण्यात आले सन्मानित
Posted On:
30 JAN 2026 5:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जानेवारी 2026
भारताच्या ऊर्जा भविष्याला आकार देणारे नवोन्मेषक, स्टार्टअप्स आणि उद्योग धुरिणांचा सन्मानित करून भारत ऊर्जा सप्ताह 2026 चा समारोप झाला. 27 जानेवारी ते 30 जानेवारी 2026 दरम्यान गोव्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आठवडाभर चाललेल्या या प्रमुख जागतिक ऊर्जा परिषदेने जागतिक ऊर्जा परिसंस्थेत भारताची मध्यवर्ती भूमिका अधोरेखित करत सुरक्षित, शाश्वत आणि परवडणाऱ्या ऊर्जा भविष्यासाठी व्यावहारिक उपायांना चालना देण्यासाठी धोरणकर्ते, व्यावसायिक नेते, नवोन्मेषक आणि गुंतवणूकदारांना एकत्र आणले.
अविन्या -ऊर्जा स्टार्टअप चॅलेंज
अविन्या चॅलेंजने ऊर्जा क्षेत्रासाठी अभिनव , तंत्रज्ञान-संचालित उपाय प्रदान करणाऱ्या उदयोन्मुख भारतीय स्टार्टअप्सना सन्मानित केले.

- विजेता: मिनिमाइन्स क्लीनटेक सोल्युशन्स - हार्दिक, अनुपम कुमार यांना लिथियम-आयन बॅटरीमधून उच्च-मूल्य असलेल्या सामग्रीची कमी-कार्बन पुनर्प्राप्ती प्रदान करणाऱ्या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण एचएचएम प्रक्रियेसाठी सन्मानित करण्यात आले. ही कंपनी सौर पॅनेल, कॅटॅलिटिक कन्व्हर्टर आणि स्थायी चुंबकाच्या क्षेत्रांमध्ये विस्तार करत आहे.
- प्रथम उपविजेता: ओसस बायोरिन्यूएबल्स - डॉ. सुरुची राव, कमर सुहेल बाशा यांना औद्योगिक सांडपाण्याचे हरित हायड्रोजनमध्ये रूपांतर करणाऱ्या त्यांच्या जैवरासायनिक प्रक्रियेसाठी गौरवण्यात आले.
- द्वितीय उपविजेता: ट्रान्झमीओ आयटी सोल्युशन्स - सफिल सनी, राकेश मिश्रा, यांनी एआय-आधारित फायबर-सेन्सिंग अनुप्रयोगांच्या माध्यमातून पाइपलाइन, व्हेंट्स आणि सीसीयूएस प्रक्रियांवर अचूक देखरेख ठेवली.
- तृतीय उपविजेता: रेझलिटिक्स टेक्नॉलॉजीज - दीपशंकर नंदा, विनय भारद्वाज यांनी एआय-चालित डीप इन्फॉर्मेशन मॅक्सिमायझेशन इंजिनद्वारे तेल आणि वायू उत्खननात क्रांतिकारी बदल घडवून आणला.
- चौथा उपविजेता: पेट्रोबॉट टेक्नॉलॉजीज - साहब गुर्जर, शशी फग्ना यांनी हायड्रोकार्बन प्लांट आणि जहाजांमध्ये रोबोटिक निरीक्षण सोल्यूशन विकसित केले.
वसुधा - ओव्हरसीज अपस्ट्रीम स्टार्टअप चॅलेंज
या आंतरराष्ट्रीय आव्हानाने अपस्ट्रीम तंत्रज्ञानाचा विकास करणाऱ्या स्टार्टअप्सची दखल घेतली.

- विजेता: सेनेर्जेटिक्स, द नेदरलँड्स - फ्रान्सिसकस जोहाना जेकब्स, अनिता यांनी एआय-संचालित गंज निरीक्षण प्रणाली विकसित केली जी सुरक्षित, शाश्वत संचालन सुनिश्चित करते.
- उपविजेता: रेझर्माइन इंक, अमेरिका - अँटोन मालकोव्ह आणि अमित कुमार यांनी हॉके हायब्रिड मॉडेल इंजिन विकसित केले जे रिझर्व्हायर इंजीनियरिंग वर्कफ्लो अनुकूलित करते.
हॅकेथॉन चॅलेंज
सात प्रमुख संस्थांनी भाग घेतला, ऊर्जा तंत्रज्ञानातील समस्यांवर नवोन्मेषी उपाय सुचवणाऱ्याना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले :

- विजेता: आयआयटी मुंबई - सौतिक भक्त, प्रा. कुमार हेमंत सिंग यांनी ऑरा हा एआय-चालित युनिफाइड रिझर्व्होअर अॅनालिसिस प्लॅटफॉर्म विकसित केला जे सेमी-सुपरवाईज्ड सीएनएन ट्रान्सफॉर्मर फ्रेमवर्कचा वापर करते.
- उपविजेता: आयआयटी दिल्ली – स्वागत सब्यसाची साहू, अक्षीत अग्रवाल, मनोज्ञ सुनील चोरडिया, देबरुण बॅनर्जी, प्रा. विक्रांत, चक्रीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून स्टील उद्योगातील मळी, अशुध्द घटकांचा वापर करून सीओटू हस्तगत करण्यासाठी आणि खनिजीकरणासाठी द्वि-क्षारकीय द्रावक-आधारित तंत्रज्ञानाची निर्मिती
एफआयपीआय / आयआयपी वार्षिक उद्योग पुरस्कार
एफआयपीआय म्हणजेच फेडरेशन ऑफ इंडियन पेट्रोलियम इंडस्ट्रीने शोध मोहीम राबविणे, उत्पादन, शुद्धीकरण, नवोन्मेष आणि वायू वितरण क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी कंपन्या आणि व्यक्तींना सन्मानित केले.

- वर्षातील सर्वोत्तम शोध मोहीम राबविणारी कंपनी: ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ओएनजीसी ) – कार्यक्षम, सुरक्षित आणि शाश्वत शोध मोहीम राबविण्यामध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मान.
- वर्षातील सर्वोत्तम तेल आणि वायू उत्पादन कंपनी (एक दशलक्ष टन तेल समतुल्य पेक्षा जास्त): ऑइल इंडिया लिमिटेड – प्रगत पुनर्प्राप्ती तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन कार्यक्षम, सुरक्षित आणि शाश्वत उत्पादनातील नेतृत्वासाठी पुरस्कार
- वर्षातील सर्वोत्तम तेल आणि वायू उत्पादन कंपनी (1 दशलक्ष टन तेल समतुल्य पेक्षा कमी): सन पेट्रोकेमिकल्स प्रा. लि.
- वर्षातील सर्वोत्तम शुध्दीकरण प्रकल्प : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, सेझ रिफायनरी, जामनगर – कार्यान्वयन कार्यक्षमता, ऊर्जा संवर्धन आणि शाश्वततेमधील अपवादात्मक कामगिरीसाठी पुरस्कार
- वर्षातील सर्वोत्तम नवोन्मेष करणारी कंपनी (संयुक्त विजेते):
- संशोधन आणि विकास विभाग, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड – स्वदेशी ‘झोमॅक्स कॅप’ लाइट-नॅफ्था आयसोमेराइझेशन तंत्रज्ञानाची संकल्पना आणि अंमलबजावणी केल्याबद्दल पुरस्कार.
- इनोव्हेशन सेंटर, मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड – औद्योगिक कार्यांमध्ये गंधहीन प्रक्रिया तंत्रज्ञान सादर केल्याबद्दल पुरस्कार.
- वर्षातील सर्वोत्तम व्यवस्थापित प्रकल्प: शेल इंडिया (पीएमजी संयुक्त उपक्रम) – काकी येथे भारतातील पहिला ऑफशोर विघटन प्रकल्प कार्यान्वित केल्याबद्दल.
- वर्षातील सर्वोत्तम शहर गॅस वितरण कंपनी: इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड – पाइपलाइन नेटवर्कचा विस्तार आणि सीएनजी पायाभूत सुविधांच्या वाढीसाठी पुरस्कार
- वर्षातील सर्वोत्तम वाहिनीमार्फत वाहतूक करणारी कंपनी: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड – कार्यान्वयन उत्कृष्टता आणि शाश्वत वायूवाहिनी व्यवस्थापनासाठी पुरस्कार.
- वर्षातील सर्वोत्तम तेल विपणन कंपनी: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड – कार्यान्वयन, डिजिटल उपक्रम आणि शाश्वत ऊर्जा उपायांना प्रोत्साहन दिल्याबद्दल.
- वर्षातील कर्तृत्ववान युवा :
- महिला: वनश्री महात्रे, पाइपलाइन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड – व्यावसायिक कौशल्या साठी आणि आत्तापर्यंत ज्याची माहिती मिळत नव्हती अशा ठिकाणची वायू गळती बंद करण्यासाठी आणि पर्यायी पुरवठा मार्ग सक्षम करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल पुरस्कार
- पुरुष: कार्तिक आर., मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड – इनोव्हेशन सेंटर टीमचे नेतृत्व करणे, आविष्कारांचे व्यावसायिकीकरण करणे आणि कार्यान्वयन कार्यक्षमता वाढवण्यासाठी.
या नवोन्मेषकांना आणि या क्षेत्रातील धुरिणांना सन्मानित करून ‘इंडिया एनर्जी वीक 2026’ यशस्वीरित्या संपन्न झाला. या ऊर्जा सप्ताहामुळे भारताचे वाढते ऊर्जा नेतृत्व, देशाची शाश्वततेची धडपड आणि जागतिक ऊर्जेचे भविष्य घडवण्यात भारताची भूमिका अधोरेखित केली गेली.
पुरस्कार आणि पुरस्कार विजेत्यांच्या तपशीलवार सूचीसाठी येथे क्लिक करावे.
भारत ऊर्जा सप्ताहाविषयी माहिती
इंडिया एनर्जी वीक अर्थात भारत ऊर्जा सप्ताह हे देशाचे प्रमुख जागतिक ऊर्जा व्यासपीठ आहे. यामुळे सुरक्षित, शाश्वत आणि परवडणाऱ्या ऊर्जा भविष्याकडे प्रगतीला गती देण्यासाठी सरकारी नेते, उद्योग कार्यकारी आणि नवोन्मेषकांना एकत्र आणते. एक तटस्थ आंतरराष्ट्रीय मंच म्हणून, ‘आयईडब्ल्यू’ जागतिक ऊर्जा परिस्थितीला आकार देणारी गुंतवणूक, धोरणात्मक सुसंवाद आणि तांत्रिक सहकार्याला चालना देते.
* * *
शैलेश पाटील/सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2220955)
अभ्यागत कक्ष : 28