संरक्षण मंत्रालय
प्रजासत्ताक दिन संचलन 2026 : सर्वोत्तम कवायत आणि सर्वोत्तम चित्ररथांचे निकाल जाहीर
महाराष्ट्राच्या "गणेशोत्सव : आत्मनिर्भरतेचे प्रतीक’’ चित्ररथाला प्रथम पुरस्कार
Posted On:
28 JAN 2026 10:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जानेवारी 2026
प्रजासत्ताक दिन संचलन -2026 साठी तिन्ही सेवा आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल/इतर सहाय्यक दलांमधील सर्वोत्तम कवायत तुकड्या आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि मंत्रालये/विभागांमधील सर्वोत्तम चित्ररथांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. कवायत करणा-या तुकड्या आणि चित्ररथांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी स्थापन केलेल्या तीन परीक्षकांच्या तुकडीने खालील विजेत्यांची निवड केली आहे:
- तिन्ही सेवांमधील सर्वोत्तम कवायत तुकडी – भारतीय नौदल
- केंद्रीय सशस्त्र पोलीस दल/इतर सहाय्यक दलांमधील सर्वोत्तम कवायत तुकडी – दिल्ली पोलीस
- शीर्ष तीन चित्ररथ (राज्ये/केंद्रशासित प्रदेश):
1. महाराष्ट्र (गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक)
2. जम्मू आणि काश्मीर (जम्मू आणि काश्मीरच्या हस्तकला आणि लोकनृत्य)
3. केरळ (जलमार्गी मेट्रो आणि 100 % डिजिटल साक्षरता: आत्मनिर्भर भारतासाठी आत्मनिर्भर केरळ)
- केंद्रीय मंत्रालये/विभागांमधील सर्वोत्तम चित्ररथ - संस्कृती मंत्रालय (वंदे मातरम – एका राष्ट्राची आत्मिक हाक)
- विशेष पारितोषिक:
1. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग (वंदे मातरम – 150 वर्षांचे स्मरण)
2. ‘वंदे मातरम: भारताचा शाश्वत नाद’ - नृत्य गट
नागरिकांना त्यांच्या आवडत्या चित्ररथ आणि कवायत करणा-या तुकड्यांना मत देण्यासाठी ‘माय गव्ह पोर्टल’ वर आयोजित केलेल्या ऑनलाइन मतदानावर आधारित ‘लोकप्रिय पसंती’ श्रेणीचे निकाल खालीलप्रमाणे आहेत:
- तिन्ही सेवांमधील सर्वोत्तम कवायत करणारी तुकडी - आसाम रेजिमेंट
- केंद्रीय सशस्त्र पोलीस दल/इतर सहाय्यक दलांमधील सर्वोत्तम कवायत करणारी तुकडी – सीआरपीएफ
- शीर्ष तीन चित्ररथ (राज्ये/केंद्रशासित प्रदेश):
1. गुजरात (स्वदेशीचा मंत्र – आत्मनिर्भरता – स्वातंत्र्य: वंदे मातरम)
2. उत्तर प्रदेश (बुंदेलखंडची संस्कृती)
3. राजस्थान (वाळवंटाचा सुवर्ण स्पर्श: बिकानेर सुवर्ण कला (उस्ता कला))
- केंद्रीय मंत्रालये/विभागांमधील सर्वोत्तम चित्ररथ – शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग (राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 : विकसित भारताच्या दिशेने भारतीय शालेय शिक्षणाला गती)
* * *
शैलेश पाटील/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2220919)
अभ्यागत कक्ष : 21