पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना वाहिली श्रद्धांजली
प्रविष्टि तिथि:
30 JAN 2026 1:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जानेवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. मोदी म्हणाले की, बापूंनी नेहमीच स्वदेशीवर भर दिला, जो विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या आपल्या संकल्पाचा एक आधारस्तंभ आहे. "त्यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य देशवासियांना कर्तव्याच्या मार्गावर चालण्यासाठी नेहमीच प्रेरणा देत राहील", असे मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले:
"राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त शतशः नमन. पूज्य बापूंनी नेहमीच स्वदेशीवर भर दिला, जो विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या आपल्या संकल्पाचा देखील आधारस्तंभ आहे. त्यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य देशवासियांना कर्तव्याच्या मार्गावर चालण्यासाठी नेहमीच प्रेरणा देत राहील."
* * *
नेहा कुलकर्णी/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2220781)
आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam