लोकसभा सचिवालय
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दुःख व्यक्त केले
प्रविष्टि तिथि:
28 JAN 2026 6:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जानेवारी 2026
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
आपल्या शोकसंदेशात बिर्ला यांनी म्हटले आहे:
"महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतरांचा विमान दुर्घटनेत झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. अजित पवार यांनी महाराष्ट्रातील बारामती मतदारसंघातून दहाव्या लोकसभेचे सदस्य म्हणूनही काम केले आहे.
सहकार क्षेत्र, सार्वजानिक कल्याण आणि राज्याच्या विकासासाठी पवार यांनी केलेल्या कार्यबद्दल त्यांचे स्मरण सदैव केले जाईल.
दिवंगत आत्म्याला चिरशांती लाभो आणि शोकाकुल कुटुंबीयांना आणि समर्थकांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.
ओम शांती."
18 व्या लोकसभेच्या 7 व्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, बिर्ला यांनी सभागृहाचे नेतृत्व करत अजित पवार आणि इतर माजी सदस्यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
* * *
सुषमा काणे/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2219715)
आगंतुक पटल : 15