सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान संग्रहालयाद्वारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 129 वी जयंती साजरी

प्रविष्टि तिथि: 23 JAN 2026 6:25PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान संग्रहालयाने 23 जानेवारी 2026 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 129 वी जयंती साजरी केली. या निमित्ताने देशभक्ताचा मार्ग: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन आणि वारसा (The Patriots Path: Life and Legacy of Netaji Subhas Chandra Bose) हे एक विशेष प्रदर्शन आणि विविध सार्वजनिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयाच्या कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.


या अभिनव प्रदर्शनातून शौर्य, त्याग आणि अढळ देशभक्तीचे शक्तीशाली प्रतीक असलेल्या नेताजींच्या व्यक्तिमत्वाचे दर्शन घडते. या प्रदर्शनात संग्रहित छायाचित्रे, दुर्मिळ दस्तऐवज, एक लघुपट, आझाद हिंद सेनेचा ध्वज, नेताजींच्या धाडसी ‘ग्रेट एस्केप’चा नकाशा आणि त्यांचा क्रांतिकारी दृष्टिकोन, अतिशय जिवंतपणाची अनुभूती देणाऱ्या स्वरुपात मांडण्यात आला आहे.


या प्रदर्शनात छायाचित्रांचे विविध विभाग असून, ‘ द ग्रेट एस्केप’ , आझाद हिंद सरकार, चलो दिल्ली- आझाद हिंद सेनेची कूच, बियॉन्ड मिस्ट्री: द इमॉर्टल लिगसी, द रानीज ऑफ आझाद हिंद या आणि अशा विविध संकल्पनाअंतर्गत ही छायाचित्रे मांडली आहे.
या प्रदर्शनला भेट देणारे नागरिक प्रदर्शनाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक करत असून, हे प्रदर्शन पुढील एक महिनाभर  सर्वसामान्यांसाठी खुले राहणार आहे.

***


सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2217985) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी