युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
‘फिट इंडिया संडेज् ऑन सायकल’ या उपक्रमाच्या 58 व्या आवृत्तीचे कराईकल ते अमृतसरपर्यंत देशव्यापी आयोजन
#MYBharatMYVote या हॅशटॅग मोहीमेच्या माध्यमातून ‘संडेज् ऑन सायकल’ उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय मतदार दिनही साजरा केला जाणार
प्रविष्टि तिथि:
23 JAN 2026 6:13PM by PIB Mumbai
फिट इंडिया संडेज् ऑन सायकलची 58 वी आवृत्ती 25 जानेवारी रोजी देशव्यापी स्तरावर आयोजित केली जाणार आहे. या साप्ताहिक तंदुरुस्ती उपक्रमाचे प्रदेश, संस्था आणि समुदायांच्या सीमा ओलांडून लोकचळवळीत कशा रितीने रुपांतर झाले याचे दर्शन या देशव्यापी आयोजनातून घडणार आहे. या आठवड्यातील आवृत्तीचे नेतृत्व केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया करणार असून. याअंतर्गत ते पुद्दुचेरीतील कराईकलमध्ये नागरिकांसोबत सायकल चालवतील. या उपक्रमातून केंद्र सरकार तंदुरुस्ती, शाश्वतता आणि सक्रिय जीवनशैलीवर देत असलेला भर अधोरेखित होणार आहे.
या वर्षीचा राष्ट्रीय मतदार दिन #MYBharatMYVote या हॅशटॅग मोहिमेअंतर्गत आणि विकसित भारताचे युवा मतदार या संकल्पनेअंतर्गत साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने तंदुरुस्ती, युवा सहभाग आणि लोकशाही मूल्यांचे अभिसरण घडवून आणण्यासाठी ‘फिट इंडिया संडेज् ऑन सायकल’ ही देशव्यापी मोहीमही राष्ट्रीय मतदार दिनासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारे ठरणार आहे.
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे, ऑलिंपियन बॉक्सर निखत झरीन, क्रिकेटपटू सिद्धार्थ कौल तसेच भारतीय अभिनेते रागिणी द्विवेदी आणि विवेक दहिया हे या उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होतील. या उपक्रमाच्या निमित्ताने खेळाडू, तरुण आणि ‘सेलिब्रिटी’ एकमेकांच्या बरोबरीने सायकल चालवतील. त्यामधून तंदुरुस्त राष्ट्र आणि मजबूत लोकशाही हातात हात घालून चालत असल्याचा संदेश दिला जाईल.
एक मजबूत लोकशाही ही आरोग्यदायी आणि जागरूक नागरिकांवर अवलंबून असते. संडेज् ऑन सायकल उपक्रमाला राष्ट्रीय मतदार दिन आणि #MYBharatMYVote मोहिमेशी जोडून, आम्ही युवा भारतीयांना तंदुरुस्तीचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत आणि त्याचबरोबर राष्ट्राचे भविष्य घडवण्याच्या प्रक्रियेतल्या त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देत आहोत असे केंद्रीय मंत्री डॉ. मनसूख मांडविया यांनी म्हटले आहे.
किनारपट्टीलगतच्या शहरांपासून ते सीमावर्ती भागांपर्यंत तसेच आघाडीच्या शैक्षणिक संस्थांपर्यंत, ‘संडेज् ऑन सायकल’ हा उपक्रम एका खऱ्या लोकचळवळीच्या स्वरुपात परावर्तीत झाला असल्याचेही त्यांनी नमूद केले. तंदुरुस्ती कशा प्रकारे विविध क्षेत्रांतील आणि विविध पार्श्वभूमीच्या नागरिकांना एकत्र आणू शकते आणि सक्रिय जीवन जगण्याच्या सवयीला कशारितीने एक परस्पर सामायिक राष्ट्रीय संस्कृती बनवू शकते हेच या उपक्रमातल्या वाढत्या सहभागातून दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
तंदुरुस्तीला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याच्या उद्देशाने पंतप्रधानांनी 29 ऑगस्ट 2019 रोजी फिट इंडिया मूव्हमेंट या अभियानाचा प्रारंभ केला होता. आपल्या सवयींमध्ये बदल घडवून आणणे आणि शारीरिकदृष्ट्या अधिक सक्रिय जीवनशैलीकडे वाटचाल करणे हे या अभियानाचे मुख्य ध्येय आहे.
0BKU.jpeg)
88LV.jpeg)

***
सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2217914)
आगंतुक पटल : 10