रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
एकात्मिक पायाभूत सुविधा विकासाला बळकटी देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि कोकण रेल्वे यांच्यात सामंजस्य करार
प्रविष्टि तिथि:
21 JAN 2026 7:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जानेवारी 2026
एकात्मिक पायाभूत सुविधा विकासाला बळकटी देण्यासाठी, एनएचएआय आणि रेल्वे मंत्रालयाअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (केआरसीएल) यांनी आज सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली. या करारानुसार संसाधनांचा सर्वोत्तम वापर आणि परस्पर फायदेशीर संधींचा शोध घेण्यासाठी सहकार्याची एक व्यापक चौकट स्थापित केली जाईल. नवी दिल्ली येथील एनएचएआय मुख्यालयात एनएचएआयचे अध्यक्ष संतोष कुमार यादव आणि एनएचएआय आणि केआरसीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला पाठबळ देण्यासाठी आणि संपर्क सुविधा वाढवण्यासाठी दोन्ही संस्थांचे पूरक सामर्थ्य आणि तांत्रिक कौशल्याचा लाभ घेणे, हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे.
सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे पायाभूत सुविधांच्या एकात्मिक विकासाचे नियोजन, म्हणजेच रेल्वे-आणि-रस्ते पूल आणि बोगदे, मल्टी-मोडल लॉजिस्टिक्स पार्क, इंटर-मोडल हब आणि ज्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग रेल्वे मार्गांना छेदतात, अथवा त्यांच्या बरोबर अस्तित्वात असतात, अशा ठिकाणी ‘ग्रेड सेपरेटर’ (स्तरिय विभाजक) या गोष्टींचा समावेश आहे. सामंजस्य करारामध्ये जिथे शक्य असेल तेथे सामायिक उपयोगिता कॉरिडॉरच्या विकासाचीही कल्पना मांडली आहे. सुरुवातीच्या पाच वर्षांसाठी हा सामंजस्य करार वैध राहील.
सुवर्णा बेडेकर/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2217050)
आगंतुक पटल : 9