संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलाने तीन बॉटम ओपनिंग नॉन-प्रोपेल्ड बार्जेसच्या उत्पादनासाठी ठाण्याच्या सूर्यदिप्ता प्रोजेक्ट्स कंपनीशी केला करार
प्रविष्टि तिथि:
19 JAN 2026 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जानेवारी 2026
भारतीय नौदलाने 03 x 200T क्षमतेच्या बॉटम ओपनिंग नॉन-प्रोपेल्ड बार्जेसच्या उत्पादन व वितरणासाठी सूर्यदिप्ता प्रॉजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, ठाणे (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग जहाजबांधणी केंद्र) यांच्याशी 16 जानेवारी 2026 रोजी करार केला आहे.बार्जेस म्हणजे सपाट तळाचे मोठे मालवाहू जहाज. त्यात माल सोडण्यासाठी तळाशी व्यवस्था केलेली असते.त्यांना स्वत:चे इंजिन नसते. अशा बार्जेस आता भारतातच तयार होणार असल्यामुळे त्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमांचे त्या प्रतीक ठरतील. तसेच, त्या इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंगच्या नियमांनुसार बांधल्या जातील, म्हणजेच आंतरराष्ट्रीय दर्जाची सुरक्षितता आणि गुणवत्ता मानकांचे पालन करून तयार होतील.
एमएसएमई जहाजबांधणी केंद्रांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचा विकास घडवून आणणे यासाठीची आपली ठाम वचनबद्धता भारतीय नौदलाने या कराराद्वारे दाखवली आहे. यामुळे देशातील जहाजबांधणी उद्योगाला मोठे बळ मिळेल आणि हे सर्व 'मेरिटाईम इंडिया व्हिजन – 2030' च्या उद्दिष्टांशी सुसंगत राहील.
(2)G4PE.jpeg)
(3)L3MY.jpeg)
सुषमा काणे/प्रज्ञा जांभेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2216239)
आगंतुक पटल : 12