पंतप्रधान कार्यालय
पार्वती गिरी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पंतप्रधानांचे त्यांना अभिवादन
प्रविष्टि तिथि:
19 JAN 2026 2:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जानेवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पार्वती गिरी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना आज अभिवादन केले आहे. वसाहतवादी राजवट संपवण्यासाठीच्या चळवळीत त्यांनी बजावलेली भूमिका, समाजाच्या सेवेबद्दलची त्यांची तळमळ तसेच आरोग्यसेवा, महिला सक्षमीकरण आणि संस्कृती यासारख्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची मोदींनी प्रशंसा केली आहे.
यासंर्भात एक्स समाज माध्यमावर लिहिलेल्या स्वतंत्र पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणतात:
"पार्वती गिरीजींच्या जन्मशताब्दीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. वसाहतवादी राजवट संपवण्याच्या चळवळीत त्यांनी प्रशंसनीय भूमिका बजावली. समाजाच्या सेवेबद्दलची त्यांची तळमळ तसेच आरोग्यसेवा, महिला सक्षमीकरण आणि संस्कृती यासारख्या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. गेल्या महिन्याच्या #MannKiBaat मध्ये मी जे म्हटले होते ते पुढे आहे."
नेहा कुलकर्णी /मंजिरी गानू/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2216071)
आगंतुक पटल : 19
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam