वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक व्यापार क्षेत्रातील मंदीवर मात करत भारताच्या वस्त्रोद्योग आणि तयार कपड्यांच्या निर्यात वाढीचा वेग कायम

प्रविष्टि तिथि: 16 JAN 2026 10:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 जानेवारी 2026

जागतिक व्यापार क्षेत्रात मंदी असूनही, भारताच्या वस्त्रोद्योग आणि तयार कपड्यांच्या निर्यातीने लवचिकता आणि स्थिर वाढ नोंदवली आहे. यामधून या क्षेत्राची जुळवून घेण्याची क्षमता,  वैविध्यपूर्ण बाजारपेठेतील उपस्थिती आणि मूल्यवर्धित आणि श्रम-केंद्रित क्षेत्रातील सामर्थ्य प्रतिबिंबित होते. या क्षेत्राने सलग दुसऱ्या महिन्यात सकारात्मक वाढ नोंदवली. नोव्हेंबर 2025 मधील मजबूत वृद्धीनंतर, डिसेंबर 2025 मधील निर्यात डिसेंबर 2024 च्या तुलनेत 0.40% ने वाढून 3.27 अब्ज अमेरिकी डॉलर्सवर पोहोचली.

डिसेंबर 2025 दरम्यान, हस्तकला (7.2%), तयार कपडे (2.89%) आणि एमएमएफ यार्न, कापड आणि तयार वस्तू (3.99%) याच्या निर्यात वाढी सह, प्रमुख विभागांमध्ये व्यापक निर्यात वाढ दिसून आली. हा कल, जागतिक मागणीच्या अस्थिर परिस्थितीतही मूल्यवर्धित उत्पादन, पारंपरिक हस्तकला आणि रोजगार-केंद्रित उत्पादनात भारताचा स्पर्धात्मक फायदा अधोरेखित करतो.

भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राने 2024 च्या याच कालावधीच्या तुलनेत 118 देश आणि निर्यात गंतव्यस्थानांमध्ये निर्यातीत वाढ नोंदवली, यावरून बाजारपेठेतील कामगिरीत व्यापक सुधारणा दिसून येते. या काळात, स्पेन (7.9%), फ्रान्स, इटली, नेदरलँड्स, जर्मनी आणि युनायटेड किंगडम यासारख्या प्रमुख युरोपियन बाजारपेठांमधील स्थिर निर्यात वाढीसह, संयुक्त अरब अमिराती (9.5%), इजिप्त (29.1%), पोलंड (19.3%), सुदान (182.9%), जपान (14.6%), नायजेरिया (20.5%), अर्जेंटिना (77.8%), कॅमेरून (152.9%), आणि युगांडा (75.7%), या देशांसह, उदयोन्मुख आणि पारंपरिक अशा दोन्ही बाजारपेठांमध्ये मोठी निर्यात वाढ दिसून आली.

एकूणच, सातत्यपूर्ण निर्यातीची गती, बाजारपेठेतील वाढते अस्तित्व आणि मूल्यवर्धित क्षेत्रांची मजबूत कामगिरी, यामुळे कापड आणि तयार कपड्यांच्या क्षेत्रातील विश्वासार्ह आणि लवचिक जागतिक पुरवठादार, म्हणून भारताचे स्थान अधिक बळकट झाले आहे. वैविध्य, स्पर्धात्मकता आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या सहभागावर सतत भर दिल्यामुळे, हे क्षेत्र आगामी काळात निर्यात वाढ करण्यासाठी आणि जागतिक मूल्य साखळ्यांशी अधिक घट्ट जोडले जाण्यासाठी सक्षम आहे.


 शैलेश पाटील/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2215510) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati